तैमूर सैफला म्हणतो तुझं डोकं फोडीन!

अभिनेता सैफ अली खानचा 'जवानी जानेमन' हा नवा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे. याचं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफने तैमूरचा एक मजेदार किस्सा सर्वांना सांगितला.

अभिनेता सैफ अली खान ‘जवानी जानेमन’ या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच कालावधी नंतर सैफचा चित्रपट येत असल्याने त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात तो एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नेहमीच चर्चेत असणारा सैफचा मुलगा तैमुरचा विषय निघाला आणि सैफने एक मजेदार किस्सा सर्वांना सांगितला.

सैफला त्याच्या पालकत्वाबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. जसे की तुम्ही कशाप्रकारे तैमूरचे पालन करता? त्याचा खोडकर स्वभाव पाहता त्याच्यावर कसे लक्ष ठेवता? तुम्ही पालक म्हणून कडक शिस्तीचे आहात की सौम्य? यावर सैफने काही मजेशीर उत्तरे दिली. आता मला तैमूरशी थोडंस कडक वागलं पाहिजे, अशी भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, “त्याला त्याच्या मनाप्रमाणे करायचं अससात, त्यासाठी तो घरात सर्वांना धमकावत असतो.”

घरातल्यांना असा धमकावतो तैमूर

तैमूर इमोशनल ब्लॅकमेल करतो का? असं विचारल्यावर सैफ अली खान म्हणाला की, “तो खूप गोड आहे, पण त्याला मनमानी करायची असते. यानंतर त्याला कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं की मला तुम्ही आवडत नाही. मी तुम्हाला मारीन, तुमचं डोकं फोडीन!’ असं तो म्हणतो. त्याला शाळेतही जायचं नसतं.”

कसा आहे सैफचा नवा सिनेमा

‘जवानी जानेमन’ येत्या ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे. याआधी सिनेमाचे काही पोस्टर रिलीज झाले होते. जवानी जानेमन एक रोमॅंटिक कॉमेडी आहे. ट्रेलरमध्ये सैफ अली खान, तब्बू आणि आलिया अशी तिघांची मजेशीर केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. जवानी जानेमनच्या माध्यमातून सैफ अली खान आणि तब्बूची जोडी जवळपास २० वर्षांनंतर पडद्यावर एकत्र  पाहायला मिळणार आहे.