माहितीय का? ज्योतिष आणि अंक गणितानुसार कसं असेल vicky आणि Katrinaचं नव आयुष्य

दोघांच्या लग्नाला घेऊन अनेक ज्योतिष आचार्य आणि अंकगणित तज्ञांनी अनेक तर्क वितर्क वर्तवले आहेत

How will life of vicky kaushal and katrina kaif after marriage acordding to astrology and numerology
माहितीय का? ज्योतिष आणि अंक गणितानुसार कसं असेल vicky आणि Katrinaचं नव आयुष्य

विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नाचे रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. दोघे कुठे लग्न करणार इथपासून ते लग्नात कोणत जेवण असणार इथपर्यंत सगळ्या चर्चा सुरू आहेत. मग आता लग्नानंतरच कतरिना आणि विक्की यांच आयुष्य किती सुंदर असेल असं सर्वांनाच वाटल असेल. दोघांच्या लग्नाला घेऊन अनेक ज्योतिष आचार्य आणि अंकगणित तज्ञांनी अनेक तर्क वितर्क वर्तवले आहेत. लग्नानंतर दोघांचे ग्रह नक्षत्र किती अनुकूल असतील यासंदर्भात जोधपूरचे पंडित सुरेश श्रीमाली यांनी एक दावा केला आहे. एबीपी हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे. ज्योतिष आणि अंक गणितानुसार विक्की आणि कतरिना यांच आयुष्य कसं असेल याविषयी काय म्हणालेत ज्योतिषी जाणून घ्या.

पंडित सुरेश श्रीमाली यांनी असे म्हटले आहे की, कोणत्याही लग्नात केतूमध्ये आला तर लग्नाला विलंब होतो, लग्नाआधी भांडणं होतात किंवा लग्नानंतर भांडण होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे लग्नात चंद्राची फार महत्त्वाची भूमिका असते. कतरिनाच्या जन्म राशीप्रमाणे तिच्या लग्नादिवशी कुंभ राशीत चंद्र आहे. त्यामुळे या मुहूर्तावर विक्की आणि कतरिनाच्या लग्नात विलंब होऊ शकतो.

रागावर नियंत्रण ठेवावे लागणार

विक्की आणि कतरिनाचं लग्न २०२१मध्ये होईल पण २०२३मध्ये त्यांच्या राशीत शनी आडवा येईल. त्यांच्यात अनेक विषयांवरुन भांडणे होतील. कतरिनाला तिच्या रागावर कंट्रोल करावा लागेल तर ती तिचा संसार ठिक ठाक करू शकेल. ९ तारिखला दोघांच्या लग्नाआधी षडाष्टक दोषाचे निवारण करावे लागेल तर त्यांचे पुढील वैवाहिक जीवन सुरळीत सुरू राहिल, असे पंडित सुरेश श्रीमाली यांनी म्हटले आहे.

षडाष्टक दोष दूर करावा लागेल

पंडितने पुढे असे म्हटले आहे की, विक्की आणि कतरिना यांच्यातील षडाष्टक दोष दूर केला नाही तर दोघांमध्ये सतत कडाक्याची भांडणे होतील. सततच्या भांडणांमुळे दोघांमध्ये अंतर निर्माण होईल. जर दोघांचा रक्तगट सारखा असेल तर रक्तदान करता येत नाही तसेच विक्की आणि कतरिना यांच्यात असल्याचे पंडित सुरेश श्रीमाली यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Vicky-Katrina Wedding : विकी- कतरिनाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात, दोघांविरोधात गुन्हा दाखल