घरमनोरंजन'विक्रम वेधा'मध्ये ऋतिक खलनायक तर सैफ अली खान नायक; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘विक्रम वेधा’मध्ये ऋतिक खलनायक तर सैफ अली खान नायक; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Subscribe

नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टीझप प्रदर्शित करण्यात आला असून या टीझरमध्ये ऋतिक कधीही न दिसलेल्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेला हा टीझर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेता ऋतिक रोशनला पुन्हा एकदा एका चित्रपटामध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. 2002 नंतर आता पुन्हा एकदा दोघही ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामध्ये दिसून येतील. या चित्रपटात दोघांमध्ये जबरदस्त फायटींग सोबतच काही अॅक्शन सीन सुद्धा दिसून येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टीझप प्रदर्शित करण्यात आला असून या टीझरमध्ये ऋतिक कधीही न दिसलेल्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेला हा टीझर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

ऋतिक रोशन अ‍ॅक्शनमोडमध्ये तर सैफचा लूकवर चाहते फिदा
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या टीझरमध्ये सैफ अली खान आणि ऋतिख रोशन वेगवेगळ्या भूमिकेत दिसून येत आहेत. हा टीझर 1 मिनिट 54 सेकंदाचा असून या टीझरमध्ये अॅक्शन सीनसोबतच अनेक जबरदस्त डायलॉग सुद्धा आहेत. तसेच या टीझरमध्ये सैफ अली खान आणि राधिता आपटे यांचे काही रोमाँटिक सीन सुद्धा दिसत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर सैफ अली खान चित्रपटातील नायकाची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेत्री राधिका आपटे ही नायिकेच्या भूमिकेत असेल.

- Advertisement -

या चित्रपटाचा टीझर पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटामध्ये साउथ सुपरस्टार विजय सेतुपति आणि आर माधवनने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. दरम्यान, ऋतिक आणि सैफचा हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी 2002 मध्ये ऋतिक रोशन आणि सैफ अली खानने ‘ना तुम जानो ना हम’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.


हेही वाचा :अभिनेते परीक्षित सहानींच्या जीवनावर ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ पुस्तक लवकरच होणार प्रकाशित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -