घरमनोरंजनऋतिक रोशन आणि सबा आजाद करणार लग्न?

ऋतिक रोशन आणि सबा आजाद करणार लग्न?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि गायिका सबा आजाद मागील अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीला अनेक स्पॉट देखील केलं जातं. शिवाय अनेकदा हे सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचं प्रेम देखील व्यक्त करताना दिसत असतात. दरम्यान, अशातच समोर आलेल्या माहितीनुसार सबा आणि ऋतिक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

ऋतिक रोशन आणि सबा आजाद करणार लग्न?

सबा आजाद आणि ऋतिक रोशन नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतता. अनेकदा हे दोघे रोमाँटिक अंदाजात देखील दिसतात. मागील अनेक दिवसांपासून सबा आणि ऋतिकच्या लग्नाची सतत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते.

सोशल मीडियाद्वारे झाली होती ओळख

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

- Advertisement -

सबा आजाद आणि ऋतिक रोशन यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती त्यानंतर हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते अनेकदा डेटवर आणि डिनरसाठी जाताना स्पॉट झाले. बॉलिवूडमधील विविध पार्ट्यांमध्ये देखील दोघांना एकत्र पाहिलं जातं.

ऋतिकचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट

ऋतिक रोशनने 2000 मध्ये सुझान खानशी लग्न केले होते. दोघांना रिहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत.
ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचा 2014 साली घटस्फोट झाला. सध्या ऋतिक रोशन सबा आजादला डेट करत आहे तर सुझान खान आणि अर्सलान गोनीला डेट करत आहे.

- Advertisement -

ऋतिक रोशनचे आगामी चित्रपट

ऋतिक रोशन येत्या काळात दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


हेही वाचा :

वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बावल’चा टीझर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -