घरताज्या घडामोडी'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनचा जोडीदार असणार 'हा' अभिनेता

‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनचा जोडीदार असणार ‘हा’ अभिनेता

Subscribe

सध्या बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) ‘फायटर’ची तयार करत आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. परंतु यापूर्वी ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha)च्या हिंदी रिमेकबाबत एक खुलासा झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने शुक्रवारी एका पोस्टच्या माध्यमातून हृतिक रोशनसोबत ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता सैफ अली खान दिसणार असल्याचे सांगितले आहे. ओरिजनल चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर गायत्रीच हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत.

‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकबद्दल अंदाज लावला जात आहे की, हा चित्रपट पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. २०१७ साली पुष्कर गायत्रीने खुलासा केला होता की, ते ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक करतील. ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात विजय सेतुपति आणि आर.माधवनने काम केले होते. आर. माधवन यामध्ये विक्रम नावाच्या पोलिसाची भूमिका केली होता, तर विजय सेतुपतिने वेधाची भूमिका केली होती. आता ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनला पाहणे हे चाहत्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

- Advertisement -

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच त्याने ‘फायटर’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात हृतिक अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे. पहिल्यांदाच हृतिक दीपिकासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. याशिवाय हृतिक ‘क्रिश-४’ मध्ये दिसणार आहे.


हेही वाचा – घटस्फोटानंतर आमिर-किरण ‘लाल सिंग चड्ढा’च्या सेटवर दिसले एकत्र; पाहा व्हायरल सेल्फी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -