Video: हृतिकला १७ वर्षानंतर येतेय ‘जादू’ची आठवण

हृतिकने सोशल मीडियावर जादूसोबतचा व्हिडिओ शेअर केला.

Hrithik Roshan misses ‘Jaadu’ from ‘Koi…Mil Gaya’
Video: हृतिकला १७ वर्षानंतर येतेय 'जादू'ची आठवण

अभिनेता हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने हृतिक रोशनने एलियन मित्र ‘जादू’ची आठवण येत आहे. त्यामुळे त्याने ‘जादू’ सोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हृतिकने जादूसोबत व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, ‘काही मैत्रीला वेळ आणि जागेची मर्यादा नसते. कधीतरी तो पुन्हा भेटले अशी मला खात्री आहे. धन्यवाद पप्पा, हा चित्रपट करण्यासाठी जेव्हा तुम्हाला सर्व म्हणत होते, तुम्ही वेडे झाला आहात. पण धन्यवाद तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. हे तुमच्याशिवाय शक्य झाले नसते. रेखाजीचे आभार, ज्या रोहितसाठी नेहमी उभ्या होत्या. रोहितच्या सर्व मित्रांना खूप सारं प्रेम. मिस यू ऑल.’

तसेच त्याने पुढे लिहिले की, ‘माझे काक राजेश रोशन यांच्या संगीताशिवाय कोणतीही जादू झाली नसती. या स्वप्नासाठी काम केलेल्या सर्व कलाकार आणि क्रू मेंम्बर्सचे धन्यवाद. मिस यू जादू.’

राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपट ‘कोई मिल गया’ २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिक प्रमुख भूमिकेत होता. बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी ‘कोई मिल गया’ चित्रपट एक आहे. या चित्रपटात ‘जादू’ची भूमिका अभिनेता इंद्रवदन पुरोहित यांनी साकारली होती.


हेही वाचा – ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ साजरा करा; श्रद्धा कपूरची विनंती