Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ऋतिक रोशन-सबा आजाद अडकणार विवाहबंधनात?

ऋतिक रोशन-सबा आजाद अडकणार विवाहबंधनात?

Subscribe

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा ट्रेंड सुरु आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. अशातच आतादोघंही लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही नोव्हेंबर 2023 मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, याबाबत दोघांनी कोणताही खुलासा केला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, सबाने ऋतिकच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि मुलांचा देखील स्वीकार केला आहे. ऋतिकची आधीची पत्नी सुजैनसोबत देखील सबाचे चांगले संबंध आहेत. त्यांना अनेकदा पार्टामध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत.

- Advertisement -

सबा आजाद आणि ऋतिक रोशन यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती त्यानंतर हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते अनेकदा डेटवर आणि डिनरसाठी जाताना स्पॉट झाले. बॉलिवूडमधील विविध पार्ट्यांमध्ये देखील दोघांना एकत्र पाहिलं जातं.

ऋतिक रोशनचे आगामी चित्रपट

ऋतिक रोशन येत्या काळात दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदच्या ‘फाइटर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

विराट-अनुष्काने घेतलं उज्जैनच्या महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -