घरताज्या घडामोडीVikram Vedha मधील सैफचा हटके लूक पाहिलात का ?

Vikram Vedha मधील सैफचा हटके लूक पाहिलात का ?

Subscribe

ह्रतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सैफचा सिनेमातील हटके लूक शेअर केला आहे. त्याचप्रमाणे ह्रतिकने सिनेमाच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. विक्रम वेधा हा सिनेमा ३० सप्टेंबर २०२२ ला रिलीज होणार आहे.

Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशचा अपकमिंग सिनेमा विक्रम वेळा मधील अभिनेता सैफ अली खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. डोळ्यांवर चश्मा, टीशर्ट आणि जीन्समधला सैफचा पावरफुल लूकने त्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.  ह्रतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सैफचा सिनेमातील हटके लूक शेअर केला आहे. त्याचप्रमाणे ह्रतिकने सिनेमाच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. विक्रम वेधा हा सिनेमा ३० सप्टेंबर २०२२ ला रिलीज होणार आहे.

‘विक्रम’ असे कॅप्शन देत ह्रतिकने विक्रम वेधामधील सैफचा पहिला लूक शेअर केला आहे. सिनेमात सैफ विक्रम हे प्रमुख पात्र साकारणार आहे. ह्रतिकने पोस्टमध्ये पुढे म्हटलेय, ‘एक उत्तम अभिनेता आणि सहकलाकारासोबत काम करण्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली आहेत. सैफ सोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच माझ्या लक्षात राहिल. मी अनेक वर्ष या क्षणाची वाट पाहिली होती. हे क्षण मी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे’.

- Advertisement -

सैफच्या या नव्या लूकवर पत्नी करिना देखील फिदा झाली आहे. करिनाने देखील सैफचा नवीन लूक शेअर केलाय, ‘पती पहिल्यापेक्षा जास्त हॉट दिसत आहे. मी आता सिनेमा पाहण्यासाठी आणखी वाट नाही पाहू शकत नाही’,असे करिनाने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

- Advertisement -

साऊथ सिनेमाचा रिमेक

ह्रतिकच्या सिनेमात ह्रतिक वेधाची भूमिका साकारणार आहे तर सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारणार आहे. ह्रतिक खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे तर सैफ मुख्य नायकाच्या भूमिकेत. विक्रम वेधा हा सिनेमा साऊथ सुपरहिट सिनेमा ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक आहे.


हेही वाचा –  Ghudchadi : रवीना टंडन अन् संजय दत्तची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -