घर मनोरंजन अशा पद्धतीने ऋतिक रोशन साजरा करणार त्याचा 49 वा वाढदिवस

अशा पद्धतीने ऋतिक रोशन साजरा करणार त्याचा 49 वा वाढदिवस

Subscribe

बॉलीवूड स्टार ऋतिक रोशनचा आज वाढदिवस आहे आणि हा जन्मदिवस साजरी करण्यासाठी अभिनेत्याकडे खूप काही आहे. तसेच, देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या हृतिकने 2022 मधील ‘विक्रम वेधा’या चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांची मने जिंकली. अशातच, ऋतिक रोशन आता भारतातील पहिला एरिअल ॲक्शन एंटरटेनर सिनेमा ‘फाइटर’सह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे.

ऋतिक रोशन हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो नेहमीच क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर विश्वास ठेवतो. तसेच, कधीही चांगली स्क्रिप्ट न सोडता त्याने तेच चित्रपट केले जे त्याला खरोखर करायचे होते. ही प्रेरणा आणि ज्ञान अभिनेत्याच्या वैयक्तिक जीवनातही दिसून येते, कारण हृतिक रोशन आता त्याचा वाढदिवस एक अशी संधी म्हणून पाहतो जिथे तो अशा गोष्टीत वेळ देऊ शकतो ज्या त्याला फुलफिल करतात. वाढदिवसानिमित्त त्याच्या उत्साहाबद्दल विचारले असता, हृतिक म्हणाला, “मी वाढदिवस एक मजेशीर दिवस म्हणून पाहायचो पण नंतर कुठेतरी तो एक काम, एक कर्तव्य, साजरा केला पाहिजे, पार्टी झालीच पाहिजे अशाने वाढदिवस थोडा अस्वस्थतेने आला. पण आज मी या दिवसाला मला समाधान देणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ घालवण्याची संधी म्हणून पाहतो. मी अजूनही त्या गोष्टी करू शकतो, परंतु आता ही माझी स्वतःची इच्छा आणि सेंस ऑफ फुलफिलमेंटची भावना आहे आणि स्व-लादलेला आदेश नाही.”

- Advertisement -

ऋतिक रोशन नेहमीच ऑन आणि ऑफस्क्रीन खराखुरा राहिला आहे. तसेच, त्याचा ह्युमर आणि दैनंदिन जीवनातील त्याच्या वास्तविक आणि संबंधित गोष्टींमुळे तो सोशल मीडियावरील सर्वात प्रिय आयकॉन्सपैकी एक आहे यात शंका नाही.

अशातच, जेव्हा ऋतिकला विचारण्यात आले की या 49 वर्षांमध्ये त्याची सर्वात मोठी शिकवण काय आहे, तेव्हा अभिनेत्याने सांगितले, “पिरॅमिडच्या शीर्षस्थानी अशी शांतता नाही जी आपल्याला सर्व काम पूर्ण झाल्यानंतर मिळेल अशी आशा आहे. खरं तर, या क्षणी आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक कृतीचा तो बेस आणि आधार आहे. आपण शांततेत सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीची स्थिती शांत असावी.”

- Advertisement -

‘विक्रम वेधा’ मधील त्याच्या अभिनयासाठी दर्शकांकडून उदंड प्रशंसा मिळाल्यानंतर, ऋतिक रोशन आता 2023 मध्ये ‘फायटर’या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच, दीपिका पदुकोणसोबतचे त्याचे हे पहिले सहकार्य आहे.

- Advertisment -