‘केजीएफ 3’ मध्ये होणार ऋतिक रोशनची एन्ट्री? केजीएफच्या दिग्दर्शकांचा खुलासा

‘केजीएफ 2’ ने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकार संजय दत्त आणि रवीना टंडनला सुद्धा कास्ट करण्यात आलं होतं. आता लवकरच केजीएफच्या तिसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आली असून ‘केजीएफ 3’ मध्ये ऋतिक रोशनचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या एका इंटरव्यूमध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ‘केजीएफ 3’ मध्ये ऋतिक रोशनला कास्ट करण्याबाबत सांगितले आहे.

‘केजीएफ 3’ च्या स्टारकास्टबाबत सांगताना दिग्दर्शक म्हणाले की, “आम्ही अजून स्टार कास्टसंदर्भात कोणताही विचार केला नाही, ‘केजीएफ 3’चे शूटिंग यावर्षी सुरू केले जाणार नाही. कारण आमचे इतरही प्रोजेक्ट सुरू आहेत.यश सुद्धा त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. त्यामुळे आम्हाला वाटत की योग्य वेळ आल्यावर ते ‘केजीएफ 3’ चे काम सुरू करावे.”

ऋतिक रोशन करणार ‘केजीएफ 3’ मध्ये काम

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिक रोशनला ‘केजीएफ 3’ मध्ये कास्ट करण्याबाबत केजीएफचे दिग्दर्शक म्हणाले की, “एकदा आमच्या शूटिंगची तारीख फिक्स झाली की, आम्ही स्टारकास्ट फिक्स करू आणि तेव्हाच दुसऱ्या अभिनेत्यांना सुद्धा कास्ट करण्याचा विचार करू.”

‘केजीएफ 3’ चित्रपटाने जवळपास 1227 करोडची कमाई केली होती. या चित्रपटाने हिंदी भाषेत 430.95 करोडची कमाई केली होती. आता प्रेक्षक ‘केजीएफ 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 


हेही वाचा :Tiger Shroff चा ‘हीरोपंती 2’ चित्रपट लवकरच अॅमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार