हृतिक रोशनचं पुन्हा एकदा ‘शुभ मंगल’? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी

हृतिक रोशन आणि सबा काही दिवसांपूर्वी परदेशात हॉलिडे एन्जॉय करताना सुद्धा दिसले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. हृतिक आणि सबा नेमकं केव्हा लग्न करू शकतात?

बॉलिवूड मधील स्टायलिश अभिनेता हृतिक रोशन(hritik roshan) त्याच्या स्टाईल आणि लूक मुले नेहमीच चर्चेत असतो. हृतिक रोशन गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझाद(saba azad) हिला डेट करत आहे. हृतिक आणि सबा गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या त्यांच्या रिलेशनशिप बद्दल खूपच ओपन होत असल्याचं सुद्धा दिसलं. या दोघांसंदर्भांत नेहमी बातम्या सुद्धा येत असतात. माध्यमांत येत असलेल्या बातम्यांमधून हृतिक आणि सबा लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हृतिक रोशन आणि सबा काही दिवसांपूर्वी परदेशात हॉलिडे एन्जॉय करताना सुद्धा दिसले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. हृतिक आणि सबा नेमकं केव्हा लग्न करू शकतात?

हे ही वाचा – प्रश्न हा कम्फर्ट झोनचा आहे, हिंदी चित्रपटात काम करण्यावरून अल्लू अर्जुनचं मत…

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद(hritik roshan and saba azad) हे दोघंही विविह बंधनात अडकणार असल्याची अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण माध्यमांमधून जी माहिती समोर येत आहे त्यात असं म्हटलं आहे, की हृतिक आणि सबा लवकरच सात फेरे घेणार आहेत. फिल्म फेअरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली त्यात हृतिक लवकरच सबा सोबत लग्न करू शकतो. असं लिहिलं आहे. मीडियामध्ये मात्र ही अफवा वेगाने पसरत आहे. याच संदर्भात ऍस्ट्रॉलॉजर बेजान दारुवाला याने हृतिक आणि सबा यांचं लग्न होण्याहची शक्यता वर्तवली होती.

हे ही वाचा – अमिताभ बच्चन यांची अतरंगी फॅशन पाहून ट्रोलर्सनी उडवली खिल्ली; रणवीर सिंहसोबत केली…

हृतिक आणि सबा यांच्या रिलेशनशिप बद्दल नेहमीच काही न काही बातम्या समोर येत होत्या. पण हृतिक आणि सबा पहिल्यांदा मुंबईतील एक रेस्ट्रॉरंट मधून बाहेर पडताना स्पॉट झाले होते आणि तेव्हा पासूनच ते दोघं कमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या माध्यमांत जोर धरत होत्या. त्यानंतर बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या(karan johar) बर्थडे पार्टीमध्ये सुद्धा हृतिक आणि सबा यांनी एकत्रित फोटोसाठी पोज दिल्या होत्या. त्याचसोबत सबा हृतिकच्या सर्व फॅमिली फांगशन्सना सुद्धा दिसते.

हे ही वाचा –   ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत