घरमनोरंजनऋतिकने पहिल्यांदाच शेअर केला सबासोबतचा फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

ऋतिकने पहिल्यांदाच शेअर केला सबासोबतचा फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Subscribe

ऋतिक रोशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सबा आझादसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन सध्या त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्ष लहान असणाऱ्या अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वीच यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. एका डिनर डेटवर दोघे पहिल्यांदा एकत्र दिसून आले होते. त्यानंतर वारंवार दोघेही अनेक पार्टी आणि फंक्शनमध्ये एकत्र दिसून येतात. दरम्यान, इतक्या दिवसानंतर ऋतिक रोशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सबा आझादसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिक रोशनने नुकताच शेअर केलेला सबा आझादसोबतचा फोटो लंडन ट्रीपमधील असून यामध्ये सबा एका बेंचवर लहान मुलांप्रमाणे बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत ऋतिकने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘गर्ल ऑन ए बेंच’, समर 2022, लंडन’. याचं फोटोवर सबा आझादने देखील मजेशीर कमेंट केली आहे. ऋतिकच्या या पोस्टवर अनेक युजर्सने देखील कमेंट्स केल्या आहेत. त्यात एकाने लिहिलंय की, ‘पण ही कोण आहे?’ तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘काय मजबूरी होती सर’.

- Advertisement -

22 वर्षांपूर्वी सुजैन खानसोबत झालं होत लग्न
ऋतिक रोशन आणि सुजैन खानचं लग्न 2000 साली बंगळुरुमध्ये झालं होतं. यांना ऋदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. 2013 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सध्या सुजैन खान अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

या चित्रपटात दिसणार ऋतिक
येत्या काळात ऋतिक अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत ‘फाइटर’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ऋतिकचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान देखील ऋतिकसोबत मुख्य भूमिकेत होता.

- Advertisement -

हेही वाचा :

‘फोनभूत’ मधील पहिले गाणे ‘किन्ना सोना’चा टीझर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -