Aryan Khan: ह्रतिक रोशनचं काउंसलिंग करणारा कोच आता करणार आर्यनचं काउंसलिंग

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कोच म्हणून अरफिनची ओळख आहे.

hritik roshan counseler coach arfeen khan to ge counseling shahrukh khan son aryan khan
Aryan Khan: ह्रतिक रोशनचं काउंसलिंग करणारा कोच आता करणार आर्यनचं काउंसलिंग

सुरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर तो जवळपास एक महिना जेलमध्ये होता. आता आर्यनला जामीन मिळाला असला तरी दर शुक्रवारी त्याला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागते.  लक्झरी आयुष्य जगलेल्या आर्यनने एक महिना जेलमध्ये काढल्याने त्याचे मानसिक आरोग्य फार बिघडले आहे. त्यामुळे आर्यनचे काउंसलिंग करण्यासाठी हॉलिवूडमधील प्रसिद्ध लाइफस्टाइल कोच अरफिन खानला बोलावण्यात आले आहे. अरफिनने अभिनेता ह्रतिक रोशनचे देखील काउंसलिंग केले होते. बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कोच म्हणून अरफिनची ओळख आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arfeen Khan (@arfeen.khan)

अभिनेता ह्रतिक रोशनचा मधल्या काळात त्याची पत्नी सुजेन सोबत घटस्फोट झाला. या काळात ह्रतिकचे देखील मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ह्रतिकला कोच अरफिन याने मदत केली होती आणि त्याचमुळे अरफिन हा चर्चेत आला होता. आर्यन देखील त्याचे आयुष्य पहिल्यासारखे जगायला सुरुवात करावी या हेतूने शाहरुखने आर्यनच्या काउंसलिंगसाठी अरफिनला बोलावले असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांचा नंबर वन कोच आणि टेड स्पीकर म्हणून अरफिन ओळखला जातो.

ह्रतिक रोशनने देखील अरफिनचे कौतुक केले होते. ‘अरफिनकडे जादू आहे त्याचे बोलणे समोरच्या व्यक्तीला प्रभावीत करते. त्यांनी अनेकांना मदत केली आहे. ते आर्यनला देखील मदत करतील’, असे ह्रतिकने म्हटले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जेलमध्ये राहिल्याने आर्यनवर फार मानसिक ताण आला आहे. आर्यन आधीही फार शांत आणि लाईम लाइटपासून दूर होता. मात्र या प्रकरणानंतर आर्यन आणखीच शांत झाला आहे. आर्यन आधी घरातील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यायचा मात्र आता तो त्याच्या खोलीतून बाहेर देखील येत नाही. सगळ्यांपासून त्याने स्वत:ला दूर ठेवले आहे. शाहरुख आणि गौरीला त्याच्या मानसिक आरोग्याविषयी प्रचंड चिंता लागून राहिली आहे.


हेही वाचा – 5 Years of Dear Zindagi: शाहरुखने आलियाला दिला होता स्टूपिड बनण्याचा सल्ला, वाचा मजेदार किस्सा