‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली हृता दुर्गुळे एक उत्तम अभिनेत्री आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक आणि अगदी सिरीजमध्येही तिने काम केलंय. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आज आपण हृता दुर्गुळेविषयी अधिक माहिती घेऊया. (Hruta Durgule Acting Journey know about her in details)
पत्रकारितेचं घेतलंय शिक्षण
हृता दुर्गुळे ही मूळ मुंबईकर आहे. तिचा जन्म दादरमध्ये झाला. स्वभावाने अल्लड, खोडकर पण तितकीच समजूतदार अशी हृता अत्यंत सामान्य कुटुंबातून आहे. हृताला एक बहीण आणि एक भाऊदेखील आहे.
View this post on Instagram
माहितीनुसार, तिने आयईएस व्हीएन सुले गुरुजी इंग्लिश मीडियम हायस्कूल, दादर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हृताने मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे आणि त्यापुढे ॲडव्हर्टायझिंगचा अभ्यास केलाय.
अशी झाली ‘दुर्वा’साठी निवड
हृताला लहानपणी अभिनयाची अजिबात आवड नव्हती. पण कॉलेजमध्ये शिकताना विविध ऍक्टिव्हिटींमधून तिला अभिनय करणे आवडू लागले. दरम्यान, कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये इंटर्नशिप करायची म्हणून तिच्या आईने दिग्दर्शक संजय जाधवांना संपर्क केला. संजय जाधव हे तिच्या आईच्या क्लास टीचरचा मुलगा असल्यामुळे त्यांची ओळख होती.
View this post on Instagram
तेव्हा संजय जाधवांच्या माध्यमातून हृताला ‘पुढचं पाऊल’ या मालिकेसाठी ‘सहाय्यक दिग्दर्शक’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी रसिका देवधर यांनी हृताला ‘दुर्वा’ मालिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून हृताने ऑडिशन दिलं आणि या मालिकेत नायिका म्हणून तिची निवड झाली.
‘फुलपाखरू’तून मिळाली खास ओळख
2013 मध्ये स्टार प्रवाहच्या ‘दुर्वा’ मालिकेतून ती पहिल्यांदा नायिका म्हणून झळकली. या मालिकेने जवळपास हजार एपिसोडचा टप्पा पार केला. यानंतर 2017 मध्ये ‘फुलपाखरू’ मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता यशोमान आपटे झळकला होता. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. या मालिकेनंतर हृताचं फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढलं. विशेष म्हणजे, तरुणांना तिच्या सौंदर्याची अशी भुरळ पडली की अनेकांसाठी हृता क्रश ठरली.
अभिनयासोबत करतेय ‘हे’ काम
अभिनय विश्वाशी संबंधित कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना हृताने स्वबळावर इतके मोठे यश मिळवले. 2019 मध्ये तिने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकामध्ये काम केलं. ज्यात उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ती झळकली होती. या नाटकासाठी तिला झी नाट्यगौरवचा ‘नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला होता.
View this post on Instagram
मालिका, नाटकानंतर तिने दिग्दर्शक प्रताप फड यांच्या 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनन्या’मधून सिनेविश्वात पदार्पण केले. अभिनयासोबतच ती मोठमोठ्या प्रॉडक्ट्सची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही काम करतेय. शिवाय ती एक फॅशन इन्फ्ल्यून्सरदेखील आहे. हृताने 2020 मध्ये ‘सिंगिंग स्टार’ या मराठी रिऍलिटी शोचे होस्टिंग केले आहे. तसेच 2024 मध्ये ‘कमांडर करन सक्सेना’ या वेबसिरीजमध्येसुद्धा ती झळकली होती.
आगामी सिनेमा
अभिनेत्री हृता दुर्गुळेने 18 मे 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर ‘टाईमपास 3’, ‘सर्किट’ आणि ‘कन्नी’ यांसारख्या सिनेमात ती दिसली.
View this post on Instagram
येत्या काळात लवकरच ती ललित प्रभाकरसोबत झळकणार आहे. त्यांच्या चित्रपटाचे नाव ‘आरपार’ असे असून पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. दरम्यान, त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही पहा –
Rohit Sharma : कंगनाने म्हटले होते धोबी का कुत्ता, रोहितवरून शमा मोहम्मदने पुन्हा डिवचले