टाईमपास ३ आणि अनन्या मधून हृता दुर्गुळे प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक आहे. पण टेलिव्हजनवर काम करता करता हृता दुर्गुळे टाईमपास आणि अनन्या या दोन चित्रपटात झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये हृताच्या वेगळ्या भूमिका आहेत. दोन्ही भूमिका हृताने उत्तम साकारल्या आहेत. या चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.