ऋता दुर्गुळे अडकली लग्नबंधनात, नवरा आहे हिंदीतील दिग्दर्शक

अभिनेत्री ऋता दुर्गुळे प्रतिक शहा सोबत विवाह बंधनात अडकलीय. लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

छोट्या पडद्यावर आपल्या सहज सुंदर अभिनयाने भूरळ घालणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकतेच ऋता दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच ऋताने प्रतिकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. यानंतर तिने साखरपुडा केल्याची पोस्ट चर्चेत आली होती. यामुळे ऋताच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती.

ऋताने 24 डिसेंबर रोजी प्रतिक शाहसोबत साखरपुडा केला आणि 18 मे ला म्हणजेच बुधवारी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ऋताने प्रतिकसोबत लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियार ऋता आणि प्रतिकच्या लग्नातील असंख्य फोटो व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये तर ऋता अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळतेय. मराठमोळ्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी नववधुच्या रुपामध्ये ऋता अत्यंत सुंदर दिसत आहे. ऋताने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर तिच्या लग्नाची गोड बातमी शेअर करत आतापासून नेहमीसाठी एकत्र अशा आशयाचे कमेंट करत तिच्या लग्नाची डेट लिहिली आहे. यावेळी तिने टॅग देताना आवर्जुन ऋतेक हे स्पेशल टॅग देखील मेंशन केलेय. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ऋताला शुभेच्छांचे मॅसेज येण्यास सुरूवात झाली.

ऋताच्या वेडींग लूकबद्दल सांगायचे झाल्यास ऋताने पिवळ्या रंगाची आणि लाल काठ असलेली कांचीपुरम साडीची निवड केली आहे. तर प्रतीकने व्हाईट शेरवानी परिधान केली आहे. यासह रिसेस्पशनच्या वेळीही दोघांनी आउडफीट मॅच केले असून अत्यंत सुंदर रुपात दोघेही झळकत आहेत.

मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे ‘दुर्वा’ या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती ‘फुलपाखरू’ मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तिची क्रेज पाहता मराठी अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाहत्यांकडून या नवीन दाम्पत्याला खूप शुभेच्छा मिळत आहेत.