घरमनोरंजन'कांतारा'ला भरघोस प्रतिसाद आणि शानदार कमाई !

‘कांतारा’ला भरघोस प्रतिसाद आणि शानदार कमाई !

Subscribe

हिंदी 'कांतारा'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई केली. दुसर्‍या दिवशी अंदाजे 2.35 कोटींचा गल्ला कमवला. म्हणजे दोन दिवसांत एकूण 3.62 कोटींचा बिझनेस केला आहे.

संतोष खामगावकर

‘कांतारा’ या चित्रपटाची कथा कथा दक्षिण भारतातील तुलू नाडू संस्कृतीशी संबंधित आहे. कथेमध्ये शिवा नावाचा एक हिरो आहे. त्याच्याभोवती चित्रपटाचे कथानक विणलेले आहे. या कथेत एका राजाने, एका दगडाच्या बदल्यात आपली काही जमीन गावकऱ्यांना दिली होती. गावकरी या दगडाला देव मानत होते. वर्षांमागून वर्षे लोटल्यानंतर आता त्या राजाचे वंशज ही जमीन परत घेऊ इच्छितात.

- Advertisement -

हि जमीन देण्याच्या निर्णयात जर काही बदल केले, शब्द मागे घेतला तर अनर्थ होईल, असे देवतेने राजाला आधीच बजावलेले असते. तरीही राजाचे वंशज राजाने दिलेली जमीन परत घेऊ इच्छितात. दुसरीकडे एक फॉरेस्ट ऑफिसर गावकऱ्यांच्या विरोधात उभा राहतो. गावकरी जंगलाचे नुकसान करीत आहेत असे त्याचे मत आहे. मात्र गावकऱ्यांच्या मते, ते जंगलाचे सेवेकरी आहेत आणि जंगलावर त्यांचा अधिकार आहे. या सगळ्या गुंत्यामुळे देवता नाराज होते. पुढे काय घडते हे पाहणे हिच या चित्रपटाची कथा आहे.

अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ 30 सप्टेंबरला कन्नड आणि मल्याळमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबरला हिंदीत रिलीज झाला. ‘कांतारा’लाआयएमडीबीवर 9.6 रेटींग मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवरही या कांताराची यशस्वी घोडदौड चालू असून, भरघोस कमाई केली आहे.

- Advertisement -

कांतारा’ची कथा ऋषभ शेट्टीनं लिहीली असून तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावरही ‘कांतारा’ ट्रेंडींगमध्ये अग्रेसर आहे. फक्त 16 कोटी रूपयांत बनलेल्या या सिनेमाने बजेट कधीच वसूल झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे मर्यादीत स्क्रिन्सवर रिलीज होऊनही ‘कांतारा’ भरघोस कमाई करतोय.

कन्नडमध्ये 100 कोटीचा आकडा पार केल्यावर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून, गेल्या शुक्रवारी हा सिनेमा हिंदीत रिलीज झाला. हिंदी ‘कांतारा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई केली. दुसर्‍या दिवशी अंदाजे 2.35 कोटींचा गल्ला कमवला. म्हणजे दोन दिवसांत एकूण 3.62 कोटींचा बिझनेस केला आहे.


हे ही वाचा – दिवाळीचा सण येताच अनेकांना आठवण झाली अलार्म काकांची

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -