घरमनोरंजनHum do Humare do-'मिमी' नंतर कृतिचा दुसरा सिनेमाही होणार ओटीटीवर रिलीज

Hum do Humare do-‘मिमी’ नंतर कृतिचा दुसरा सिनेमाही होणार ओटीटीवर रिलीज

Subscribe

चित्रपटाचे मेकर्स दिनेश विजान यांनी 'हम दो हमारे दो' हा आगामी सिनेमा केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.

अभिनेत्री कृति सेनन (kriti sanon)आणि राजकुमार राव(rajkumar rao) अनेक वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘हम दो हमारे दो'(ham do hamare do) या सिनेमात दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे.मात्र हा सिनेमा थेटरमध्ये रिलीज होणार नसून फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला आहे.(Hum do Humare do OTT Release)

चित्रपटाचे मेकर्स दिनेश विजान यांनी ‘हम दो हमारे दो’ हा आगामी सिनेमा केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना अद्याप संपूर्णपणे नष्ट झाला नाहीये यामुळे सिनेमा गृहात देखील हवा तसा प्रेक्षकवर्ग गोळा होत नसल्याने मेकर्सने हा सिनेमा ओटीटीवर योग्य किंमतीमध्ये विक्री करुन सिनेमा रिलीज करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

सिनेमाची कथा-

हम दो हमारे दो या सिनेमाची कथा एका विवाहीत जोडप्याची असणार आहे. हे दोघेही स्वत: साठी  आई वडील दत्तक घेण्यासाठी धडपडत आहेत. हा एक कॉमेडी सिनेमा असणार आहे. आई वडिल दत्तक घेण्याची ही अनोखी कल्पना या सिनेमाला खास बनवते. सिनेमात रत्ना पाठक शाह अभिनेता परेश रावल यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमा अभिषेक जैन दिग्दर्शित करणार आहे.

- Advertisement -

कृति सेननच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच कृतिचा मिमी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता तसेच या सिनेमाला समिक्षकांच्या तसेच प्रेक्षकांच्या कौतूकाची थाप मिळाली होती


हे हि वाचा – Tiger 3- भाईजानला टक्कर देण्यासाठी कॅटरीना होत आहे सज्ज, जिममध्ये गाळतेय घाम

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -