घरमनोरंजनHusnn Hai Suhana Song Out: वरुण-साराची दिसणार जबरदस्त केमिस्ट्री

Husnn Hai Suhana Song Out: वरुण-साराची दिसणार जबरदस्त केमिस्ट्री

Subscribe

हा चित्रपट येत्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील हुस्न है सुहाना हे गाणं गोविंदाच्या कुली नंबर १ चित्रपटातील हिट गाण्याचा रिमेक आहे.

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर १’ मधील आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. हा चित्रपट येत्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील हुस्न है सुहाना हे गाणं गोविंदाच्या कुली नंबर १ चित्रपटातील हिट गाण्याचा रिमेक आहे. या गाण्यात सारा आणि वरूण धमाकेदार डान्स करताना दिसत असून दोघांची केमिस्ट्री गाण्यात जबरदस्त आहे. ओरिजनल चित्रपटातील या गाण्याच्या रिमेक व्हर्जनला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली असली तरी गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची एनर्जी आणि एक्सप्रेशनची तुलना देखील प्रेक्षक करत आहे. चंदना दीक्षित आणि अभिजीत भट्टाचार्य यांनी हुस्न है सुहाना हे गाणे गायले आहे. या गाण्याला संगीत तनिष्क बागची आणि आनंद मिलिंद यांनी दिले आहे आणि हे गाणे समीर अंजन यांनी लिहिले आहे.

- Advertisement -

या गाण्याला ९० च्या दशकातील फ्लेवर असून ख्रिसमसच्या दिवशी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ डेविड धवनचा ४५ वा चित्रपट कूली नंबर १ चा वर्ल्ड प्रीमियर प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. वरुण धवन कोरोनाची लागण झाल्यापासून चित्रपटाचे प्रमोशन करणे त्याने थांबवले आहे. अलीकडेच वरुणने हे एक पोस्ट शेअर करत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. २५ डिसेंबर रोजी वरुणचा ‘कुली नंबर १’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.


कोरोना काळात मदत केल्यामुळे सोनूवर कोट्यावधीचं कर्ज

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -