घरताज्या घडामोडीकंगनाचा Lock Up अडचणीत, निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

कंगनाचा Lock Up अडचणीत, निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

Subscribe

हैद्राबाद येथील बिझनेसमन सनोबर बेग यांनी निर्मात्यांविरोधत तक्रार दाखल केली आहे. दिवाणी न्यायालयाने लॉक अप या शोचे स्ट्रिमिंग कोणत्याही प्लॅटफॉर्मवर न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ऑल्ट बालाजी आणि बालाजी टेलिफिल्म्सची नावे आहेत. सिटी सिव्हिल कोर्ट हैदराबादमध्ये  ९ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Lock Up  : अभिनेत्री कंगना रणौतच्या लॉक अप या नव्या शोची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कंगना या शोमध्ये अँकरिंग करताना दिसणार आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे देखील समोर आली. मात्र शो सुरू होण्यापूर्वीच शो अडचणीत आला आहे.  असा शो तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहिला नसेल असा दावा निर्माती एकता कपूरने केला होता.  परंतु निर्मात्यांवर कॉपीराईट विरोधात तक्रार करण्यात आली आहे. हैद्राबाद येथील बिझनेसमन सनोबर बेग यांनी निर्मात्यांविरोधत तक्रार दाखल केली आहे. दिवाणी न्यायालयाने लॉक अप या शोचे स्ट्रिमिंग कोणत्याही प्लॅटफॉर्मवर न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ऑल्ट बालाजी आणि बालाजी टेलिफिल्म्सची नावे आहेत. सिटी सिव्हिल कोर्ट हैदराबादमध्ये  ९ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

बिझनेसमन सनोबर बेग यांनी म्हटले आहे की, लॉक अप या शोची कन्सेप्ट द जेल या शोवर आधारित आहे. त्यांनी ही कन्सेप्ट एंडेमोल शाइन इंडियाच्या अभिषेक रेगे यांच्यासोबत शेअर केली होती. मात्र निर्माती एकता कपूर हिने ही कन्सेप्ट चोरल्याचा आरोप त्यांची केला आहे. एक आठवड्यापूर्वी शोचा प्रोमो पाहून सनोबर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by LockuppGame (@lockuppgame)

- Advertisement -

सनोबर यांनी पुढे असे म्हटलेय, द जेल ही माझी कन्सेप्ट चोरली आहे त्याचप्रमाणे जेलरपासून सेट डिझाइन पर्यंत सर्व गोष्टी जशाच्या तशा कॉपी करण्यात आल्यात. मी न्यायासाठी लढणार आहे. न्यायासाठी मला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले तरीही मी जायला तयार आहे.

- Advertisement -

लॉक अप हा इतर शोपेक्षा वेगळा शो असेल.  शोच्या निर्मात्यांनी केला होता. मात्र कॉपी राईटच्या तक्रारीनंतर निर्मात्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा –  Rula Deti Hai : तेजस्वी प्रकाश करण कुंद्राच्या गाण्याचं पोस्टर रिलीज

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -