Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Hyderabad Rape Case : सलमान खान, अक्षय कुमारसह ३८ बॉलिवूड कलाकारांवर गुन्हा...

Hyderabad Rape Case : सलमान खान, अक्षय कुमारसह ३८ बॉलिवूड कलाकारांवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर अधिकच सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ते आपल्या चाहत्यांसह फोटो पोस्ट करण्यापासून ते समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर आवाज उठवत असतात. मात्र या घटनांवर वक्त होणाऱ्या सेलिब्रिटींना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. असाच काहीसा एक प्रकार बॉलिवूडसह साऊथमधील तब्बल ३८ कलाकारांच्या बाबतीत घडला आहे. २०१९ मध्ये हैदराबाद सामूहिक बलात्कार  प्रकरणाशी संबंधीत एका घटनेवरून या सर्व सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणासंबंधीत प्रकरण

एका घृणास्पद सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे हैदराबादसह संपूर्ण देश हादरुन गेला होता. हैदराबादमध्ये ३ वर्षापूर्वी ४ आरोपींनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिला जिवंत जाळले. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. तर सोशल मीडियावर आरोपींना फाशी द्या अशी मागणी जोर धरु लागली. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र असं करणं या सेलिब्रिटींच्या अंगलट आले आहे.

पीडितेची माहिती केली जगजाहीर

- Advertisement -

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणावर सोशल मीडियातून संपात व्यक्त करताना या सेलिब्रिटींना पीडितीचे ओळख जाहीर केली. त्य़ामुळेच या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण भारतीय कायद्यानुसार, एखाद्या बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणे कायद्याने गुन्हा असून, ओळख जाहीर करणाऱ्याविरोधात दंडाची तरतुद आहे. यामुळे दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख जाहीर केल्याप्रकरणी ३८ बॉलिवूडसह साऊथ कलाकारांविरोधात गुन्हा दाखल केला.

तात्काळ अटक करण्याची मागणी

यावर वकील गौरव गुलाटी यांनी अशी मागणी केली की, एक रोल मॉडेल बनण्याऐवजी या कलाकारांनी नियमांचे उल्लंघन करत समाजात एक चुकीचा पायंडा निर्माण केला. या कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेची ओळख जगजाहीर केली. यामुळे सर्व कलाकारांवर तात्काळ कारवाई करत त्यांना अटक करा. यात सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, अनुपम, रकुलप्रीत सिंह आणि फरहान अख्तर य़ांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.


Konkan Rain Update : कोकणात मुसळधार पावसाचे थैमान; गुहाघरमध्ये पुरस्थिती, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा


- Advertisement -

 

- Advertisement -