बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास 228.98 कोटी कमावले आहेत. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. चित्रपटगृहातून अनेक चाहते व्हिडीओ देखील शेअर करत आहेत. अशातच, बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने देखील सोशल मीडियावर हा चित्रपट बघतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कार्तिक आर्यनने पाहिला ‘गदर 2’
View this post on Instagram
कार्तिक आर्यन आणि सनी देओलचा ‘गदर 2’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये पोहोचला होता. ज्याचा व्हिडीओ कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. कार्तिक आर्यनने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हा आयकॉनिक सीन, माझ्या आतीला एक फॅनबॉय तारा सिंगसाठी ओरडत आहे.” कार्तिकच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट्स करत आहेत.
100 कोटींमध्ये तयार झाला चित्रपट
11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 200 कोटींचा टप्पा पार केला आहेत. हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.