घरमनोरंजनमी पूर्णपणे बरा आहे... अपघाताची बातमी संजय दत्तने फेटाळली

मी पूर्णपणे बरा आहे… अपघाताची बातमी संजय दत्तने फेटाळली

Subscribe

बुधवारी बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांना चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. ते ‘केडीः द डेविल’ या कन्नड चित्रपटाचे चित्रिकरणामध्ये व्यस्त होते. माहितीनुसार, या अपघातात संजय दत्त यांच्या कोपर, हात आणि चेहऱ्याला दुखापत झाली अशा प्रकारच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. दरम्यान, अशातच ही बातमी समोर आल्यानंतर संजय दत्त चांगलेच संतापले आहेत. या सगळ्या अफवा असल्याचं सांगत त्यांनी ट्वीटर वरुन माहिती दिली आहे.

संजय दत्त यांचं ट्वीट चर्चेत

ट्वीट शेअर करत संजय दत्त यांनी लिहिलंय की, मी जखमी झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मी सर्वांना सांगू देऊ इच्छितो की ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरा आहे आणि ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. माझी टीम माझे सीन शूट करताना अतिरिक्त खबरदारी घेत आहे. आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आणि आमची काळजी घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. संजय दत्तच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.

- Advertisement -

‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटात संजय दत्त साकारणार खलनायकाची भूमिका

सध्या संजय दत्त त्याच्या आगामी कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’साठी बेंगळुरूच्या आसपासच्या भागात शूटिंग करत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट संपूर्ण भारतात कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल. त्याच वेळी, संजय लवकरच रवीना टंडनसोबत त्याच्या आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी समंथाची प्रकृती खालावली; ट्वीट करून स्वतः दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -