मी तर कपड्यांमुळेच प्रसिद्ध…; कंगनाच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्फीची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यात जेव्हापासून कंगनाचं ट्वीटर अकाऊंट पुन्हा सुरु झालं आहे. तेव्हापासून ती सतत बॉलिवूडवर निशाण साधताना दिसत आहे. अशातच आता कंगना आणि उर्फीचा ट्वीटर वाद सुरु झाला आहे. दोघीही एकमेकींवर ट्वीटरच्या माध्यामातून एकमेंकींवर पलटवार करत आहेत.खरंतर, या वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा कंगना म्हणाली होती की, या देशामध्ये खान अभिनेते आणि मुस्लिम अभिनेत्रींना जास्त प्रेम मिळतं.

कंगनाने आणखी एक ट्वीट शेअर केल आहे ज्यात तिने उर्फीला टॅग करत लिहिलंय की, “प्रिय उर्फी, एक आदर्श जग असेल, परंतु ते तोपर्यंत शक्य नाही. जोपर्यंत आपल्याकडे समान आचार संहिता होणार नाही. जोपर्यंत या देशाचे संविधान वाटलेले आहे. तोपर्यंत हे विभाजितच राहिल. या आपण सगळेच पंतप्रधान मोदींकडे 2024 च्या जाहिरनाम्यात समान आचार संहितेची मागणी करु, पण आपण असं करु?”

उर्फीने दिली प्रतिक्रिया

कंगनाच्या या ट्वीटवर उर्फीने प्रतिक्रिया देत लिहिलंय की, “मॅम, यूनिफॉर्म माझ्यासाठी एक बँड आयडिया आहे. मी तर कपड्यांमुळेच प्रसिद्ध झाले आहे.”

 


हेही वाचा :

इलियाना डिक्रूज रुग्णालयात दाखल! फोटो शेअर करत दिली माहिती