घरमनोरंजनहार्दिक - राहुल मुलाखतीच्या वादानंतर करण जोहरला पश्चाताप

हार्दिक – राहुल मुलाखतीच्या वादानंतर करण जोहरला पश्चाताप

Subscribe

करण म्हणतो मी जबाबदार आहे कारण हा माझा शो होता, तो माझा मंच होता. हार्दिक पांड्या आणि के. एल. राहूल यांना मी माझ्या शो बोलवले होते. असं म्हणत करणने आपली चूक अप्रत्यक्षरीत्या कबूल केली.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ गेल्या काही दिवसांपासून वादात अडकला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहूलने महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे सर्वांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. त्यानंतर बीसीसीआयने देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत ऑस्ट्रेलियातील वनडे सामन्यातून दोघांनाही बाहेर बसवले होते. आघाडीच्या क्रिकेटपटूंकडून असे बेजबाबदार वक्यव्ये होत असल्याने संपुर्ण भारतीय क्रिकेट संघावरच टीका होत होती. या सर्व प्रकारानंतर या शोचा कर्ताधर्ता करण जोहरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्व प्रकाराला मी जबाबदार आहे, असं म्हणत करण जोहरने पश्चाताप व्यक्त केला आहे.

पांड्या आणि राहूलची चौकशी सुरू

६ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या कॉफि विथ करणच्या भागात या दोघांनी महिलांबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. त्यांनतर त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर बीसीसीआयने देखील कडक पवित्रा घेतला. अद्याप त्या दोघांचीही चौकशी काही पूर्ण झाली नाही. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना कोणत्याही सामन्यात खेळता येणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. चहुबाजूंनी टीका सुरु झाल्यानंतर हार्दिकने सोशल मीडियावर लोकांची माफी मागितली, पण त्याचा काही परिणाम लोकांवर झाला नाही.

- Advertisement -

करणने मौन सोडल

अखेर यावर गेले काही दिवस गप्प बसलेल्या करणने आपले मौन सोडले आहे. करण म्हणाला, “कुठेतरी मला असे वाटत आहे की, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. कारण तो माझा शो आहे, माझा मंच आहे. यामध्ये काही चुकीचे झाले तर ती माझी जबाबदारी आहे. त्या दोघांना मी बोलावले होते”, असे म्हणत करणने आपली चूक अप्रत्यक्षरीत्या कबूल केली. करण पुढे म्हणाला की, “मी स्वत:ला वाचवत नाही, पण मी त्या दोघांना जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न मी दीपिका आणि आलियालाही विचारले होते. समोरचा माझ्या प्रश्नांची उत्तरे कसे देतोय? ते मी ठरवू शकत नाही”, असे म्हणत करणने आपली बाजू सोशल मीडियावर मांडली आहे.

बीसीसीआय सुनावनी

या एपिसोडनंतर बीसीसीआयने  हार्दिक पांड्या आणि के. एल. राहूल यांना खेळण्यास बंदी घातली आहे. ५ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल.  आगामी आयपीएल आणि विश्वचषकमध्ये या दोघांना खेळता येणार की नाही? हे तर आता वेळच सांगेल.हार्दिक पांड्या आणि के. एल.राहूलच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रेक्षकांचा रोष बघता कॉफी विथ करणचा हा एपिसोड हॉटस्टार आणि युट्यब वरून काढून टाकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -