Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन मी त्या काळातील बिनधास्त अभिनेत्री... झीनत अमानची इंस्टा पोस्ट चर्चेत

मी त्या काळातील बिनधास्त अभिनेत्री… झीनत अमानची इंस्टा पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानच्या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. झीनत अमान 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 1970 मध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक’ ही इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणाऱ्या झीनत अमानने चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. तिच्या अभिनयाने आणि नृत्याने तिला चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवून दिली. झीनत अमानने अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले होते.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून झीनत अमान तिच्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात असते. शिवाय अनेक रियॅलिटी शोमधून देखील तिने हजेरी लावली होती. अशातच झीनतने इंस्टाग्रामवर अकाऊंट पदार्पण करत स्वतःचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. झीनत वयाच्या 71 व्या अजूनही सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

- Advertisement -

सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने झीनतच्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तुम्हाला इथे पाहून आनंद झाला”, तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “मॅडम तुम्ही अजुनही खूप सुंदर दिसता आहात.” झीनत अमान यांचा फोटो नेटकऱ्यांना भावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत अमानने हे फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मी त्यावेळच्या पुरुषप्रधान बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री होते जी सेटवर बिनधास्तपणे वावरायची. तो काळ वेगळा होता. खूप दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनेक प्रेरणादायी आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर केलेलं फोटोशुट देखील अजुनही आठवतं.” असं त्यांनी लिहिलं आहे.


हेही वाचा :

‘किसी का भाई किसी की जान’ मधील पहिले गाणे ‘नैयो लगदा’ रिलीज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -