मी राखीशी खूप प्रेमाने…; आदिलच्या गर्लफ्रेंडने सांगितलं सत्य

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राखी आणि तिचा पती आदिलबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखी आदिलवर कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप केले होते. शिवाय त्याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. आदिल जामीन मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अशातच, आदिलची कथीत गर्लफ्रेंड तनु चंदेल पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे.

आदिलच्या गर्लफ्रेंडने सांगितलं सत्य

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतने नुकतंच सांगितलं की, आदिलची गर्लफ्रेंड तनु चंदेल गरोदर आहे. शिवाय आदिल आणि तनुने मिळून तिला धोका दिला आहे,. या सर्व प्रकरणाची चर्चा सुरु असताना आदिलची गर्लफ्रेंड तनु मीडियासमोर आली. यावेळी तिला पत्रकारांनी प्रश्न विचारले की, “तू खरंच राखी आणि आदिलचा संसार मोडला आहेस का? यावर तनु काहीही उत्तर दिले नाही. ती म्हणाली की, लोग तर मोदींबद्दल देखील काहीही बोलतात तर ते रडतात का?” असं तनु म्हणाली.

पुढे तनु म्हणाली की, “प्रत्येकाचे बोलणे बरोबर आहे की चूक आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला काय वाटते याने मला फरक पडत नाही आणि मी काय आहे हे मला माहीत आहे. मी राखीला 2-3 वेळा भेटले आहे आणि त्यादरम्यान मी तिच्याशी खूप प्रेमाने बोलली आहे.” असं तनु म्हणाली.

 


हेही वाचा :

‘पठाण’चा जगभरात डंका; केला 950 कोटींचा टप्पा पार