घरमनोरंजनकोणाचे मन दुखावले असेल तर तुमची माफी मागतो... आमीर खानचा व्हिडीओ डिलीट

कोणाचे मन दुखावले असेल तर तुमची माफी मागतो… आमीर खानचा व्हिडीओ डिलीट

Subscribe

हा व्हिडीओ आमीर खान प्रोडक्शन या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. ज्यातून आमीर खानने माफी मागितली असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओतील काही स्क्रिनशॉर्ट समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकताच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासंदर्भात माफी मागितली होती. परंतु आता सर्वांना आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. आमीर खानने रात्री उशीरा एक व्हिडीओ शेअर केला होता. परंतु तो व्हिडीओ त्याने लगेच डिलीट देखील केला. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा आमीर खानवर संताप व्यक्त केला जात आहे.

खरंतर, हा व्हिडीओ आमीर खान प्रोडक्शन या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. ज्यातून आमीर खानने माफी मागितली असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओतील काही स्क्रिनशॉर्ट समोर आले आहेत. त्यांपैकी एकामध्ये लिहिलंय की, आपण सगळे माणसं आहोत आणि चुका माणसांकडूनच होतात.

- Advertisement -

- Advertisement -

परंतु या व्हिडीओमध्ये कोणताही आवाज किंवा आमीरचा चेहरा दिसत नव्हता. फक्त टेक्स्टच्या माध्यमातून लिहिण्यात आलं होतं. यामधील एका मध्ये लिहिल होतं की, कधी बोलण्याने, कधी माझ्या वागण्याने, कधी नकळत, कधी रागामध्ये, कधी मस्करीमध्ये जर मी कोणाचे मन दुखावले असेल तर मी तुमची माफी मागतो. ‘मिच्छामी दुक्कडम’ या सोबतच हात जोडायची इमोजी सुद्धा पाठवली होती.

 

खरंतर, हा व्हिडीओला मिच्छामी दुक्कडमच्या निमित्ताने शेअर करण्यात आलं होतं. हे कळत-नकळत झालेल्या चुकांची माफी मागण्याचा दिवस आहे. आमीर खानच्या प्रोडक्शनतर्फे हा व्हिडीओ रात्री उशीरा शेअर करण्यात आला होता. जो सकाळी डिलीट करण्यात आला.


हेही वाचा : जेव्हा विनाश हा तमाशा असल्यासारखा साजरा केला जातो…अतुल कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -