घरमनोरंजनजुन्या शनायाची जागा मला घेता येणार नाही - ईशा

जुन्या शनायाची जागा मला घेता येणार नाही – ईशा

Subscribe

जुन्या शनायाची भूमिका उत्तमरित्या साकारली ह्यात काहीच शंका नाही. मात्र जुन्या शनायाच कॅरेक्टर जिवंत करण तितकच अवघड असल्याचे मत ईशा केसकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केले आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठीवरील गाजलेल्या मालिकमधील ‘शनाया’ हे खलनायकाचे पात्र करणारी रसिका सुनील हिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने या मालिकेमधून खलनायकाची भूमिका साकारली असली तरी देखील ती चांगलीच झळकली. मात्र तिला पुढील शिक्षणासाठी ही मालिका सोडावी लागली असून आता त्या जागी शनायाचे पात्र बानू म्हणजेच ईशा केसकर ही भूमिका साकारत आहे. गेले एक दोन दिवसच ईशाने शनायाचे पात्र घेऊन एन्ट्री केली आहे. परंतु एका नविन कलाकारांने आधीसारखं कॅरेक्टर नव्याने जिवंत करण हे तितकच अवघड असल्याचे मत ईशा केसकरने इन्स्टाग्रामवर व्यक्त केले आहे.

काय म्हणाली ईशा?

गेले एक दोन दिवस झाले ईशाने शनायाचे पात्र स्विकारले आहे. जुन्या शनायाची भूमिका उत्तमरित्या साकारली ह्यात काहीच शंका नाही आणि हीच भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. एवढ्या चिकाटीने, कष्टाने बांधलेले कॅरेक्टर सोडून जाणं सोपं नाही. पण एखाद्या नवीन कलाकाराने ते पुन्हा आधीसारखं नव्याने जिवंत करणं तितंकच अवघड असल्याचे ईशाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे मला जुन्या शनायाची जागा मला घेता येणार नाही. पण या भूमिकेसाठी मी १०० टक्के प्रयत्न करेन असे देखील ती म्हणली आहे. त्याचबरोबर तुमच्या मोठ्या मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात नवीन शनायाला जागा द्याल अशी तिने व्यक्त केली आहे. तसेच तुमच्या आधाराशिवाय आणि आशीर्वादाशिवाय शनाया अपूर्ण आहे. बानूला तर तुम्ही तुमच्या मनावर राज्य करु दिलंत आणि त्यासाठी मी तुम्हां सगळ्यांची ऋणी आहेच. मात्र माझ्या या पात्राविषयी मी तुमच्या चांगल्या, वाईट टीका, कौतुक अशा सर्वच प्रतिक्रियांची वाट पाहत आहे. ते सगळं माझ्यासाठी गरजेचे आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांचे उदंड प्रेम ईशाला मिळणार का?

शनायाला ज्याप्रमाणे प्रेम मिळाले आहे. तसेच प्रेम नविन शनायाला देखील मिळेल का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. ईशाने शनायाच्या कॅरेक्टरमध्ये एन्ट्री केली आहे. आता नवीन शनायाला प्रेक्षक तेवढ्याच प्रेमाने स्विकारतील का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Good morning!! कालच माझ्या नवर्याची बायको मालिकेत नविन शनयाची एंट्री झाली! @rasika123s ने ही भूमिका उत्तमरित्या साकारली ह्यात काहीच शंका नाही! आणि आता हीच भूमिका माझ्या वाट्याला आलीय. एखाद्याने एवढ्या चिकाटीने, कष्टाने बांधलेलं केरेक्टर सोडून जाणं सोपं नाहीच! पण नविन कलाकाराने ते पुन्हा आधीसारखं नव्याने जिवंत करणं हे ही तितंकच अवघड आहे. जुन्या शनयाची जागा मला घेता येणार नाही, पण मी प्रॉमिस करते की मी माझे १००% ह्या पात्राला देण्याचा प्रयत्न करेन❤️ बानूबाईला तर तुम्ही तुमच्या मनावर राज्य करू दिलंत, आणि त्यासाठी मी तुम्हां सगळ्यांची ऋणि आहेच! पण तुमच्या मोठ्या मनात, छोट्याशा कोपर्यात ह्या शनयाला पण जागा द्याल अशी आशा करते! वेळोवेळी तुम्ही द्याल त्या कमेंट्स, टिका, कौतुक हे सगळं माझ्यासाठी गरजेचं आहे, तुमच्या आधाराशिवाय आणि आशिर्वादाशिवाय शनया अपूर्ण राहील. प्रेम द्याल हीच अपेक्षा!? पाहात रहा माझ्या नवर्याची बायको, रा.८.00 वा. फक्त झी मराठीवर.

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_ck) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -