Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'बॉलिवूडला मी परवडणारा नाही'.... महेश बाबूने काढली बॉलिवूडची लायकी

‘बॉलिवूडला मी परवडणारा नाही’…. महेश बाबूने काढली बॉलिवूडची लायकी

Subscribe

टॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबू सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. महेश बाबूने अदिवि शेषचा चित्रपट ‘मेजर’च्या ट्रेलर लाँन्च दरम्यान आपल्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत आपलं मत मांडले. तेव्हा मीडियासोबत बोलताना तो म्हणाला की, ‘बॉलिवूडला मी परवडणारा नाही त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये काम करून आपला वेळ घालवायचा नाही.’

बॉलिवूड पदार्पणावर मांडले मत

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

बॉलिवूड चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना महेश बाबू म्हणाला की, ‘मला हिंदी चित्रपटसृष्टीकडून अनेक ऑफर येतात, परंतु मला नाही वाटत की त्या लोकांना मी परवडू शकेन. मी अशा इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाही, ज्यांना मी परवडणार नाही.’

- Advertisement -

महेश बाबूचे स्वप्न खरे होत आहे
महेश बाबू पुढे म्हणाला की, मला जी इज्जत आणि प्रतिष्ठा इथे साउथमध्ये मिळाली आहे, ती माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे मी आपली इंडस्ट्री सोडून कोणत्याही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये काम करू इच्छित नाही. मी नेहमी चित्रपट करण्याबाबत आणि मोठं बनण्याचे स्वप्न बघतो. माझी स्वप्नं आता खरी होत आहेत त्यामुळे मी आता खूप खूश आहे.

 

 


हेही वाचा :शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

- Advertisment -