‘तो’ सुखद अनुभव मला मिळाला नाही, ‘बस बाई बस’मध्ये पंकजा मुंडेंनी सांगितले तरुणपणीचे किस्से

या कार्यक्रमात सुबोध भावे पंकजा मुंनडेंना भन्नाट प्रश्न विचारताना दिसणारा आहे. आणि पंकजा मुंडे सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे खेळकर पद्धतीने देताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी आलेला नवा कोरा कार्यक्रम ‘बस बाई बस’ याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु करण्यात आला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात महिलांची ही राखीव बस एका स्पेशल व्यक्तींसाठी थांबली आहे. ‘बस बाई बस’ कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे खेळकर अंदाजात दिसल्या.

‘बस बाई बस’ कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला या कार्यक्रमाच्या आगामी भागात पंकजा मुंडे विशेष पाहुण्या म्हणून उपस्थिती लावणार असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे पंकजा मुंनडेंना भन्नाट प्रश्न विचारताना दिसणारा आहे. आणि पंकजा मुंडे सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे खेळकर पद्धतीने देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यावेळी पंकजा मुंडे यांना मोठ्या नेत्याची मुलगी म्हटल्यावर खूप कडक सुक्युरिटीमध्ये राहावं लागायचं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा माझे बाबा गृहमंत्री होते. त्यामुळे मला खूप कडक सिक्युरिटी असायची. त्यामुळे लोक माझ्यासोबत बोलायला घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली, मग ती कायम टिकली.” त्यानंतर त्यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का? असा विचारण्यात आला. त्यावेळी या गमतीशीर प्रश्नावर भन्नाट उत्तर देत म्हणाल्या की, “मला कोणी प्रपोजच केलं नाही, हा सुखद अनुभव मला मिळाला नाही. असं उत्तर देत त्या हसू लागल्या.”

दरम्यान, पंकजा मुंडेंची उपस्थिती असलेला हा भाग १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे या भागात आणखी काय मजेशीर गोष्टी पाहायला मिळणार आहेत त्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीने हा भाग आणखीच रंगतदार होणार आहे.


हेही वाचा :अल्लू अर्जुनने नाकारली 10 कोटींची ऑफर