मुंबईत स्वत:चे घर नाही मी भाड्याच्या घरात राहतो,अनुपम खेर यांचा खुलासा

अनुपम खेर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

I don't have my own house in Mumbai, I live in a rented house - Anupam Kher
मुंबईत स्वत:चे घर नाही मी भाड्याच्या घरात राहतो,अनुपम खेर यांचा खुलासा

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) असे अभिनेते आहेत ज्यांनी आयुष्यात प्रचंड संघर्ष करत आपले नाव कमावले आहे. अनुपम खेर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अनुपम खेर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील त्यांच्या संघर्षाविषयी माहिती दिली. ‘आजपर्यंत इतक्या वर्षात मुंबईत आईसाठी एक घर देखील खरेदी करू शकलो नाही. मुंबईत माझे स्वत:चे घर नाही मी भाड्याच्या घरात राहतो’, असा खुलासा अनुपम खेर यांनी केला आहे.

अनुपम खेर यांनी म्हटले की, मुंबईत माझे स्वत:चे घर नाहीये. मी आजही भाड्याच्या घरात राहतो. मी ४-५ वर्षांपूर्वी ठरवले होते की मला संपत्ती नको. ४ वर्षापूर्वी मी माझ्या आईसाठी एक घर खरेदी केले,असे अनुपम खेर यांनी म्हटले. आईसाठी घर खरेदी करताना आलेल्या अनुभवांविषयी अनुपम खेर यांनी म्हटले की, माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आई आमच्यासोबत राहू लागली. मी आईला नेहमी म्हणायचो तुझा अनुपम आहे, आणखी काय पाहिजे? मला एक घर पाहिजे असे म्हणून आईने सर्वांना धक्का दिला. मी तिला म्हणालो राजू दादाकडे घर आहे. पण आईची इच्छा आणि तिचे स्वप्न होते की तिच्याकडे एक घर असावे. शिमलामध्ये देखील ती भाड्याच्या घरात राहत होती.

आईने एक घर पहिले आणि तिला ते आवडले. तिने मला फोन केला आणि सांगितले. त्यानंतर घराच्या मालकाशी बोलून घर विकत घेतले. एक दिवस आईला घेऊन मी त्या घरी गेलो आणि आईला विचारले ‘हे घर कसे आहे?’ त्यावर आईने सांगितले ‘घर खूप छान आहे’.  ‘मी घर विकल घेतले आहे’ असे आईला सांगितले, त्यावर आई ‘तुझे डोके ठिकाणावर आहे का मला नको इतकं मोठं घर’ असे म्हणत मला ओरडली. अनुपम खेर यांनी आईला घर खरेदी करुन दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील आनंदाने मी भरुन पावलो असे अनुपम खेर यांनी म्हटले.


हेही वाचा – फक्त 40 दिवस एकत्र होतो, ‘शेरशाह’च्या लेखकाने केला विक्रम-डिंपल यांच्या लव्हस्टोरीचा उलगडा