घरमनोरंजनमला शेअर्सचे शून्य ज्ञान... सेबीने बंदी घातल्यानंतर अर्शद वारसीने दिली प्रतिक्रिया

मला शेअर्सचे शून्य ज्ञान… सेबीने बंदी घातल्यानंतर अर्शद वारसीने दिली प्रतिक्रिया

Subscribe

शेअर्समध्ये फेरफार करून आर्थिक लाभ मिळविल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतर 44 जणांवर गुरुवारी कारवाई करत, बाजार नियामक ‘सेबी’ने त्यांच्यावर एक वर्षांसाठी भांडवली बाजारातील व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. युट्यूबच्या माध्यमातून कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा दिशाभूल करणाऱ्या सल्ल्यामुळे त्यांच्याविरोधात ही बंदी घालण्यात आली आहे.

साधना ब्रॉडकास्ट स्टॉक्सच्या किमतीत हेराफेरी होत असल्याची तक्रारी नियामक सेबीला प्राप्त झाली होती . जे युनिट हे काम करत आहेत ते शेअर्सही काढून घेत आहेत असं समोर आलं. या प्रकरणाची चौकशी करताना बाजार नियामकाने गुरुवारी अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि साधना ब्रॉडकास्टच्या प्रमोटर्ससहित 44 युनिट्सला सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यापार करण्यास बंदी घातली आहे. ब्रॉडकास्ट कंपनीच्या ज्या प्रमोटर्सना सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यात श्रेया गुप्ता, गौरव गुप्ता, सौरभ गुप्ता, पूजा अग्रवाल आणि वरुण एम सहभागी आहेत.

- Advertisement -

गुंतवणूक दारांना दाखवले होते आमिष

समोर आलेल्या माहितीनुसार, सेबीकडे आलेल्या तक्रारींमध्ये असे सांगण्यात आले की, गुंतवणूक दारांना प्रलोभन देण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारे व्हिडीओ अपलोड करण्यात आले. या तक्रारींवर सेबीने गेल्या वर्षी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर साधना ब्रॉडकास्टचे शेअर्स गगनाला भिडले आणि प्रमोटर्सने भरपूर पैसे कमावल्याचे तपासात समोर आले.

दरम्यान, अशातच या संपूर्ण प्रकरणावरबाबत सांगण्यासाठी अर्शद वारसीने एक ट्वीट शेअर केलंय ज्यात त्याने लिहिलंय की, “येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. मारिया आणि मला शेअर्सचे शून्य ज्ञान आहे. सल्ला घेतल्यानंतर शारदामध्ये गुंतवणूक केली आणि इतर अनेकांप्रमाणे आम्हीही आमचे कष्टाचे पैसे गमावले.” असं अर्शदने लिहिलं आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

मध्यरात्री दोन तरुणांनी केला शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केलं गजाआड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -