घरमनोरंजनमी माझ्या मुलांना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवतो... रितेश देशमुखचा खुलासा

मी माझ्या मुलांना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवतो… रितेश देशमुखचा खुलासा

Subscribe

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलियाचा ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांच भरपूर प्रेम मिळालं. उत्तम कलाकार असणारे रितेश-जिनिलिया खऱ्या आयुष्यात आई-वडील म्हणून देखील आपल्या दोन्ही मुलांचं खूप छान सांभाळ करतात. नुकत्याच एका मुलाखतीत रितेशने मुलांच्या संगोपनाबाबत खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

मिळालेल्या माहितीनुसार, रितेशने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यात त्याने त्याच्या प्रोशनल आयुष्यापासून ते पर्सनल आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात आपल्या दोन्ही मुलांबाबत सांगताना रितेश म्हणाला की, “मी माझ्या मुलांना टीव्ही, आयपॅड अशा सर्व गोष्टींपासून खूप लांब ठेवले आहे. कारण आजकालच्या पिढीने बाहेर जाऊन फुटबॉल, क्रिकेट यांसारखे मैदानी खेळ खेळायला हवे. यामुळे मैंदुला चालना मिळते. आता आयपीएल सुरु आहे त्यांना आयपीएलबाबत सर्व काही ठाऊक आहे. दोघेही दंग होऊन मॅच पाहतात.”

- Advertisement -

रितेश पुढे म्हणाला की, मी आणि जिनिलियाने आमच्या मुलांना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवले आहे. माझ्या मुलांनी आत्तापर्यंत माझे केवळ ‘वेड’ आणि ‘टोटल धमाल’ हे दोनचं चित्रपट पाहिले आहेत. त्याचे आई-वडील कलाकार आहेत याची त्यांना माहिती नव्हती.” असं रितेश म्हणाला.

 

- Advertisement -

हेही वाचा :

जाहिरातीत झळकली शाहरुखची लेक; पाहा पहिली झलक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -