मला टरबूज खूप आवडतं….पराग कान्हेरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

शेफ पराग कान्हेरेने त्याच्या फेसबुक अकाऊंवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय की, "I just love the melon (टरबूज)salad..

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर अखेर काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली, तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास राजभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदेंच्या दहा दिवसाच्या बंडाचे फळ त्यांना मिळाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सामाजिक , राजकीय, सामान्य जनता तसेच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांकडूनही एकनाथ शिंदेंना अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत.दरम्यान अशातच आता बिग बॉस मराठी फेम पराग कान्हेरेने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

शेफ पराग कान्हेरेने त्याच्या फेसबुक अकाऊंवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय की, “I just love the melon (टरबूज)salad.. no matter how much people criticize.. melon (टरबूज) is good for health.. सवयी बदला, जीवन बदलेल,” असं लिहून परागने ही पोस्ट शेअर केली आहे. पराग कान्हेरेची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.

या पोस्टवर युजर्स अनेक गमतीशीर कमेंट्स देखील करत आहेत. त्यापैंकी एकाने लिहिलंय की, “गड आला पण कलिं ‘गड’ गेला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अरे पराग भावा..आता टरबूजाबरोबर…प्रताप सरनाईक वगैरेंची काकडी पण आहे रे तुला सैलैड म्हणून खायला.” तिसऱ्याने लिहिलंय की, “शेफ पण आज काल बाजारात चांगले टरबूज नाहीत.” त्यावर पराग म्हणाला, बघून घ्यायचे नीट…विकणाऱ्यावर विश्वास न ठेवता.” अनेकजण परागची ही पोस्ट राजकीय असल्याची युजर्स म्हणत आहेत.


हेही वाचा :सफलतेची एक प्रेरणादायी गोष्ट… कंगना रनौतने एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा