मी स्वत: खूप आश्चर्यचकित झालो…सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या नात्यावर राजीव सेनची प्रतिक्रिया

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने आपल्या बहीणीच्या आणि ललित मोदीच्या नात्यावर आपलं मत मांडलं आहे

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या प्रेमप्रकरणामुळे वारंवार चर्चेत असते. नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सांगितलंय की, ते आणि सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोघेजण मालदीवमध्ये फिरायला गेले होते. दरम्यान या रिलेशनशिपच्या बातमीवर सुष्मिता सेनची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

पण याचं दरम्यान सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने आपल्या बहीणीच्या आणि ललित मोदीच्या नात्यावर आपलं मत मांडलं आहे. राजीव सेन म्हणाला की, “मला या बाबतीत कोणतीच माहिती नव्हती. हे कधी आणि कसं झालं, मला याबद्दल काहीही ठाऊक नाही.” खरंतर राजीव सेन सुद्धा सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या रिलेशनशिपच्या बातम्या ऐकूण आश्चर्यचकित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीव सेन म्हणाला की, “मला याबाबत कोणताच अंदाज नाही. या बातम्या ऐकूण मी खूप आश्चर्यचकित झालो आहे, पण मी माझ्या बहिणीसाठी खूश आहे.”

दरम्यान, गुरूवारी ललित मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर सुष्मिता सेन सोबतचे काही फोटो शेअर करत ट्वीटमध्ये म्हणाले की, “मालदिव आणि सारदिनीआ येथे कुटुंबासोबत ग्लोबल टूर केल्यांतर आम्ही लंडनला पोहोचलो आहोत. माझी बेटर हाफ सुश्मिता सेन हिच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात.”

दरम्यान, सुष्मिता सेनने १९९४ मध्ये मिस युनिवर्सचा होण्याचा मान पटकावला होता. मागील काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन अॅक्टर रोहमन शॉल याला डेट करत होती. तो तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. तिच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात रोहमन दिसला आहे. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याचा खुलासा खुद्ध सुश्मिता सेन हिनेच केला होता. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा :लग्नाच्या अफवेनंतर ललित मोदींनी केला खुलासा, म्हणाले सुश्मिता सेनसोबत…