घरट्रेंडिंग'कॉलेजमध्ये होतो ड्रग अॅडिक्ट'- रणबीरचा खुलासा

‘कॉलेजमध्ये होतो ड्रग अॅडिक्ट’- रणबीरचा खुलासा

Subscribe

'कॉलेजच्या दिवसांमध्ये मीसुद्धा ड्रग अॅडिक्ट होतो', असा धक्कादायक खुलासा अभिनेता रणबीर कपूरने केला आहे.

अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेला संजू सिनेमा सध्या सगळीकडे गाजतोय. आतापर्यंत २०० कोटींची कमाई केलेल्या संजू सिनेमाने काही नवे रेकॉर्डसही बनवले आहेत. अभिनेता संजय दत्त त्याच्या खासगी आयुष्यात व्यसनांच्या आणि विशेषत: ड्रग्सच्या आहारी गेल्याचे जगजाहीर आहे. संजू सिनेमातही संजय दत्तचं ड्रग ऑडिक्शन दाखवण्यात आलं आहे. मात्र, सिनेमात संजयची भूमिका साकरणारा अभिनेता रणबीर कपूर देखील कधीकाळी ड्रग्सच्या आहारी गेला होता. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. ‘कॉलेजमध्ये असताना मी अमली पदार्थांच्या आहारी गेलो होतो. मात्र, योग्यवेळी मी जाळ्यातून बाहेर पडलो’,अशाप्रकारचा खुलासा रणबीरने केला आहे.

वेळेवर बाहेर पडलो म्हणून…

रणबीरच्या ड्रग अॅडिक्शनविषयी फार कमी लोकांना ठाऊक असेल. रणबीरने डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे,की ”मी कॉलेजमध्ये असताना असा एक काळ आला होता, ज्यावेळी मी व्यसनांच्या पूर्णपणे आहारी गेलो होतो. मला ड्रग घेण्याची लत लागली होती. मात्र, व्यसनांच्या या जाळ्यात राहिलो तर भविष्यात माझं काहीही भलं होणार नाही हे मला कळलं. त्यामुळे यातून मी वेळेवर बाहेर पडलो.” दरम्यान रणबीर कपूरच्या या कबुलीमुळे त्याच्या चाहत्यांच्या आणि इंडस्ट्रीतील अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार हे नक्की. तर दुसरीकडे याबाबत तरुणांना संदेश देताना रणबीर म्हणाला की, ”संजू सिनेमातून आजच्या तरुणांना बरंच काही शिकण्यासारखं आहे. अमली पदार्थांचं सेवन करणं वाईट असून त्यामुळे केवळ काही क्षणांचा आनंद मिळतो. मात्र, हे अमली पदार्थ तुमचं आयुष्य उध्वस्त करु शकतात.”

वाचा :  ‘संजू’ने मागे टाकलं ‘बाहुबली’ सिनेमाला!
         ‘संजू’:देशद्रोही व्यसनाधीन तरुणाचं ग्लोरिफिकेशन’!


‘संजू’ची घोडदौड सुरुच…

मोठ्या गाजावाजासह प्रदर्शित झालेल्या रणबीरच्या संजू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड संजूने आपल्या नावावर केला आहे. प्रदर्शनानंतर मागील ५ दिवसांत सिनेमाने जवळपास २०० कोटींची भरघोस कमाई केली आहे. राजकुमार हिरानी यांचं लेखन- दिग्दर्शन असलेल्या संजू सिनेमात अभिनेता रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय परेश रावल, विकी कौशल,मनिषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -