दिशाला करायचंय टायगरसोबत लग्न; परंतु टायगरने दिला नकार

टायगर श्रॉफ त्याच्या चित्रपटांसोबतच दिशा पटानीसोबतच्या नात्यामुळे देखील वारंवार चर्चेत असतो. मागील काही दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मागील 6 वर्षांच्या नात्यानंतर दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. चाहत्यांमध्येही हा शो लोकप्रिय आहे. शोमधील सेलिब्रिटींच्या मजेशीर गोष्टी आणि गॉसिप्स चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. सध्या या शोचा सातवा सीझन सुरू आहे. आत्ता पर्यंत या कार्यक्रमात बॉलिवूड तसेच टॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. दरम्यान, नुकत्याच या कार्यक्रमाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अभिनेत्री कृती सेनन आणि अभिनेता टायगर श्रॉफ एकत्र दिसून येणार आहेत.

दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या चित्रपटांसोबतच दिशा पटानीसोबतच्या नात्यामुळे देखील वारंवार चर्चेत असतो. मागील काही दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मागील 6 वर्षांच्या नात्यानंतर दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. कॉफी विथ करणमध्ये टायगरने याबाबत खुलासा केला आहे. तसेच तो म्हणाला की, सध्या तो सिंगल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

‘कॉफी विथ करण’मध्ये टायगर श्रॉफने या गोष्टीचा खुलासा करताना सांगितले की त्याचा आता ब्रेकअप झाला असून सध्या तो एकटा आहे. करणसोबत टायगर म्हणाला की, “मी एकटा आहे. कमीत कमी मला तर असं वाटत आणि सध्या मी इकडे-तिकडे पाहत आहे.” तसेच त्याने त्याला श्रद्धा कपूर आवडत असल्याचं देखील सांगितलं. हे सांगताना तो म्हणाला की, “मी नेहमी श्रद्धा कपूरला पाहिल्यावर प्रभावित होतो. मला वाटतं की ती ग्रेट आहे.” याआधी सुद्धा टायगरने त्याला श्रद्धा आवडत असल्याचं कबूल केलं होतं की,शाळेत असताना श्रद्धा कपूर त्याची क्रश होती.

दिशाला करायचय टायगरसोबत लग्न
6 वर्षाच्या नात्यानंतर दिशा आणि टायगरचा ब्रेकअप झाला. मिळालेल्या माहितीनुसार, टायगरने स्वतः दिशासोबत ब्रेकअप केला आहे. खरंतर दिशाला टायगर सोबत लग्न करायचे होते, परंतु टायगरने तिला लग्नासाठी नकार दिला. ज्यामुळे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.


हेही वाचा : कोणाचे मन दुखावले असेल तर तुमची माफी मागतो… आमीर खानचा व्हिडीओ डिलीट