घरमनोरंजनअश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे टिक-टॉक स्टारने दिली आत्महत्येची धमकी

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे टिक-टॉक स्टारने दिली आत्महत्येची धमकी

Subscribe

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोमवारी संध्याकाळी राजस्थानी डान्सर आणि टिक-टॉक स्टार प्रिया गुप्ता हिने एक रडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या राजस्थानी टिक-टॉक स्टारने तिला कोणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे. या प्रकरणात सायबर क्राइम पोलिसांनी लक्ष देऊन त्या आरोपीला अटक करण्याची विनंती केली आहे. तसंच या व्हिडिओमध्ये ती अशी म्हणाली की, ‘मला ओळखत असलेल्या लोकांना माहित आहे की, या व्हायरल अश्लील व्हिडिओमध्ये मी नाही आहे. परंतु कोणीतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.’

‘मी झोपू शकले नाही आहे. कारण ज्याने हे केलं आहे तो फरार आहे आणि हे ज्याने कोणी केलं आहे त्याची ओळख पटलेली नाही आहे. मी माझ्या कुटुंबासाठी स्टेजवर नृत्य करून व्हिडिओ करत असते. त्यामुळे माझं आणि माझ्या कुटुंबियांचं पोट भरतं. मात्र लोकांनी माझ्या अश्लील व्हिडिओ तयार करून मला चुकीचे ठरवलं आहे’, असं प्रिया गुप्ता म्हणाली आहे.

- Advertisement -

Priya Gupta Sona Babu ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ನವೆಂಬರ್ 26, 2019

ती पुढे असं म्हणाली की, ‘आज हे माझ्यासोबत घडलं आहे. उद्या तुमच्या घरातील बहिण किंवा मुलींसोबत असं घडलं तर? मी तुम्हाला आणि पोलिसांनी विनंती करते की लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधू काढा. जर असं करणाऱ्याचा शोध लागला नाहीतर मी आत्महत्या करेन. या सर्वांसाठी मी खूप कष्ट केले आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – Video: सेल्फी काढताना चाहत्याचे साराबरोबर असभ्य वर्तन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -