घरमनोरंजनयापुढे नाटकात काम न करण्याचा सुबोध भावेचा इशारा

यापुढे नाटकात काम न करण्याचा सुबोध भावेचा इशारा

Subscribe

नाटकादरम्यान अनेक प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असतात. त्यामुळे उपस्थित उतर प्रेक्षकांची आणि कलाकारांची एकाग्रता भंग होते. अनेकवेळा कलाकारांना नाटकातील संवाद म्हणताना अडथळा निर्माण होतो. या विरोधात अनेक वेळा मराठी, हिंदी नाट्य कलाकारांनी आवाज उठवला आहे. काही दिवासांपूर्वी अभिनेता सुमित राघवनने देखील या विषयी संताप व्यक्त केला होता. आता अभिनेता सुबोध भावेने देखील या कलाकारांमध्ये समावेश झाला आहे.

- Advertisement -

नाटक सुरू असताना जे प्रेक्षक मोबाईल वापरतात, मोबाईलवर बोलतात अशा प्रेक्षकांवर सुबोध संतापला आहे. नाटकादरम्यान जर असेच प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असतील तर यापूढे नाटक करणार नाही असा इशारा त्यांने दिला आहे. सुबोध भावेचे सध्या ‘अश्रृंची झाली फुले’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना सुचना करून देखील मोबाईल फोन वाजतो. त्यामुळे नाटकात व्यत्यय येतो. या सगळ्या प्रकारामुळे सुबोध प्रेक्षकांवर चांगलाच संतापला आहे. आपला संताप त्याने सोशलमिडीयावर पोस्ट लिहून व्यक्त केला आहे.

सुबोध म्हणतो की, अनेक वेळा सांगून,विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही.यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्यामध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा आहे. नाटक काय टिव्हीवर पण बघता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -