घरमनोरंजन'किशोरदा आणि लतादीदींचं ते गाणं मी रिलीज करणार!'- हिमेश रेशमिया

‘किशोरदा आणि लतादीदींचं ते गाणं मी रिलीज करणार!’- हिमेश रेशमिया

Subscribe

लोकप्रिय गायक अमित कुमार. महान गायक किशोर कुमारला वाहिलेली सुरेल श्रद्धांजली म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.

‘इंडियन आयडॉल सत्र १२’ मधील आगामी वीकेंड हा ‘किशोर कुमार 100 सॉन्ग्स स्पेशल’ भाग असणार आहे. या अत्यंत गाजलेल्या गायन रियालिटी शो चा मंच यावेळी सुशोभित करणार आहे, लोकप्रिय गायक अमित कुमार. महान गायक किशोर कुमारला वाहिलेली सुरेल श्रद्धांजली म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. परीक्षक नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि अन्नू मलिक प्रेमाने या पाहुण्या गायकाचे स्वागत करतील. स्पर्धकांनी सादर केलेली सुमधुर गाणी सगळ्या श्रोत्यांना संगीताच्या सुवर्णकाळात घेऊन जातील.‘मरे नैना सावन भादो’, ‘अरे यार मेरी तुम भी हो गझब’ आणि ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे’ या गाण्यांवरील अंजली गायकवाडच्या अप्रतिम परफॉर्मन्सने सेटवर उपस्थित सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रमुख अतिथी अमित कुमार आणि तिन्ही परीक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. त्याच वेळी हिमेश रेशमियाने एका गाण्यामागची कथा सांगितली, जे गाणे किशोर कुमारने त्याच्या सुरुवातीच्या काळात म्हटले होते.

 पुढे हिमेश रेशमिया म्हणाला, “त्या वेळेस माझे वडील श्री. विपिन रेशमिया यांनी किशोरदांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले होते, ज्यात शास्त्रीय संगीताची छटा होती. आजही ते गाणे माझ्याजवळ आहे, जे तेव्हा रिलीज होऊ शकले नव्हते. पण हे माझे वचन आहे की, मी ते गाणे रिलीज करीन. कारण किशोरदा आणि लता दींनी म्हटलेले ते माझ्या वडिलांचे कंपोझिशन आहे.” त्याने पुढे डबिंगच्या तालमीच्या वेळेसचा किस्सा सांगताना म्हटले, “लताजींनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला आणि जेव्हा किशोरदांनी लताजींनी म्हटलेले गाणे ऐकले, तेव्हा त्यांनी तत्काळ सांगितले की, आता रेकॉर्डिंग कॅन्सल. कारण आता मीच पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही आवाजात गाणार आहे आणि पुढे ते म्हणाले, लताजींनी हे खूपच छान गाईले आहे पण मला याचा सराव करावा लागेल.” किशोरदा माझ्या वडिलांना बर्‍याचदा फोन करत असत. किशोरदांनी त्या गाण्याचा बराच सराव केला आणि मग ते रेकॉर्ड केले. हे लता आणि किशोर कुमार यांनी म्हटलेले गाणे मी नक्कीच रिलीज करीन, जे तेव्हा रिलीज होऊ शकले नव्हते.”

- Advertisement -

हे वाचा-  ‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आमदार विजय सरदेसाईंनी घातला गोंधळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -