Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'मी लग्नानंतर काम करणार नाही', अनुष्काचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘मी लग्नानंतर काम करणार नाही’, अनुष्काचा जुना व्हिडिओ व्हायरल

'वामिका'च्या जन्मानंतरही अनुष्का करतेय कमबॅक, मात्र तरीही तिच्या जुन्या व्हिडिओचीच चर्चा होत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने ११ जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला  होता. ‘वामिका’च्या जन्मानंतर अनुष्का पूर्णपणे लेकीत गुंतलेली दिसली. मात्र आता तीन महिन्यानंतर ती पुन्हा कामावर परतली आहे. नुकतेच तिचे सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासोबतच तिचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ‘मी लग्नानंतर काम करणार नाही’ असा खुलासा अनुष्काने केला होता. हा व्हिडिओ सिमी ग्रेवाल यांच्या लोकप्रिय कार्यक्रम ‘सिमी ग्रेवाल सिलेक्ट इंडिआस मोस्ट डिसाइरेबल’ मधील आहे. हा व्हिडिओ अनुष्काच्या लग्नापूर्वीचा असून ती त्यात तिच्या लग्नाच्या प्लॅन बद्दल सांगताना दिसत आहे. सिमी ग्रेवाल यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत अनुष्काला ”तुझ्यासाठी लग्न करणे महत्त्वाचे आहे का?” असा प्रश्न विचारला होता व त्यावर अनुष्का, ”मला लग्न करायचे आहे, मला मुलंही हवी आहे. लग्नानंतर कदाचित मी काम करणार नाही.” असे म्हणाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sharma (@anushkasharma5021)

 मात्र आता अनुष्का पुन्हा कमबॅक करण्याच्या चर्चा सुरु आहे. निश्चितपणे अनुष्काचा हा व्हिडिओ जुना आहे. काळासोबत विचार बदलतात, भूमिका आणि संदर्भही बदलतात. त्यानुसार अनुष्काने लग्नानंतरही काम केले व आता मुलीच्या जन्मानंतरही ती कामावर परतताना दिसत आहे. खरतर अनुष्का ने अजून दोन महिन्यानंतर कामावर परतण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तिने शेड्यूलच्या आधीच कमबॅक केला आहे. अनुष्का एका जाहिरातीच्या शूटींगसाठी सेटवर गेली होती. यानंतर ती लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्याची शक्यता आहे. तर अनुष्काने महिवला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे बायोपिक साईन केले असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे.


- Advertisement -

हे वाचा- ‘जवानी २०’ च्या निमित्ताने रेश्मा सोनावणे, हरिदास कड पुन्हा एकत्र !

- Advertisement -