घरमनोरंजन'मी सलमान खानचं कास्टिंग केलं नसतं', प्रवीण तरडे यांचं वक्तव्य

‘मी सलमान खानचं कास्टिंग केलं नसतं’, प्रवीण तरडे यांचं वक्तव्य

Subscribe

प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिट ठरलेला 'मुळशी पॅटर्न' ह्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकवरून मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे यांनी एक वक्तव्य केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला होता

मराठमोळे आणि दमदार ताकदीचे अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tarde) हे सध्या विविध चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेते, लेखक, दिग्दर्शक अशा विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. प्रवीण तरडे यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. प्रवीण तरडेंचे अनेक चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पसंती मिळवतात. तसाच ‘मुळशी पॅटर्न’ ( mulashi pattern) हा काही वर्षांपूर्वी आलेला चित्रपट सुद्धा खूप गाजला होता. या चित्रपटातील प्रवीण तरडेंच्या भूमिकेने आणि एकूणच या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी वेड लावले होते. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला होता त्यात बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (salman khan) झळकला होता. पण त्या चित्रपटातील सलमान खानच्या कास्टिंग वर प्रवीण तरडे यांनी एक वक्तव्य केले होते आणि त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा सुद्धा रंगली आहे.

स्पष्टवक्ते म्हणून सुद्धा प्रवीण तरडे यांना ओळखले जाते. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान प्रवीण तरडे यांनी सलमान खानच्या कास्टिंग विषयी सांगितले, की ‘मुळशी पॅटर्न'(mulashi pattern) हा चित्रपट शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा आहे. मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळाली होती, पण काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. हा चित्रपट जर प्रवीण तरडेने बनवला असता तर चित्रपटाचे नाव आणि कथानक कधीच बदलले नसते आणि हिंदी मध्ये सुद्धा मी चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न’ असेच ठेवले असते. मी स्वतः मुळाशी याच गावचा आहे. त्यामुळे तो चित्रपट माझ्या जवळचा आहे.

- Advertisement -

शेतीवर जगणारं हे साधन गाव मी एकेकाळी अनुभवलं आहे. मी स्वतः ते जीवन जगलो आहे आणि त्या विषयावर काम सुद्धा केले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या हिंदी रिमेक साठी ‘मी सलमान खानचं कास्टिंग कधीच केलं नसतं. कारण सलमान या भूमिकेसाठी कधीच सूट झाला नसता. असंही प्रवीण तरडे यांनी सांगितलं. प्रवीण तरडे पुढे असंही म्हणाले की मी जे चित्रपट तयार करतो त्यात सर्वात मोठी टाकद ही त्या चित्रपटाची ‘स्टारकास्ट’ असते. दरम्यान प्रवीण तरडे यांचे सरसेनापती हंबीरराव (sarsenapati hambirrao)आणि धर्मवीर (dharmveer) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि हे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचा या दोन्ही चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक अशा सगळ्याच भूमिका प्रवीण तरडे समर्थपणे पार पडत आहेत. आणि प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवत आहेत.

 

- Advertisement -

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -