घरताज्या घडामोडी'दिल्ली क्राइम २'मधून आयएएस अधिकारी साकारणार भूमिका

‘दिल्ली क्राइम २’मधून आयएएस अधिकारी साकारणार भूमिका

Subscribe

दिल्ली क्राइम २' या वेब सीरीजमध्ये स्वत: आयएएस अधिकारी अभिषेक सिंह भूमिका बजावत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे. विशेष म्हणजे या वेब सीरीजमधून ते स्वत:चीच भूमिका साकारत असल्याने आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील भूमिका कशा प्रकारे मांडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भाया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात कॅण्डल रॅली, निदर्शने, मोर्च्यांमधून याचा विरोध दर्शवला गेला. या सर्व घटनेचे थरारक वास्तव मांडणारी दिल्ली क्राइम ही वेबसीरीज प्रक्षकांसमोर आल्यानंतर याचा दुसरा भाग ‘दिल्ली क्राइम २’ मधून प्रक्षकांच्या भेटीस येत असून यात दिल्लीतील डेप्युटी कमिश्नर अभिषेक सिंह स्वत: भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Delhi-Crime-Season-2-Realease-Date

- Advertisement -

‘दिल्ली क्राइम २’ या वेब सीरीजमध्ये स्वत: आयएएस अधिकारी अभिषेक सिंह भूमिका बजावत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे. विशेष म्हणजे या वेब सीरीजमधून ते आपलीच भूमिका साकारत असल्याने ते आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील भूमिका कशा प्रकारे मांडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी म्हटले आहे की, ‘मला विश्वास आहे या भूमिकेला ते न्याय देतील. ते त्यांच्या अनुभवातून घटनेच्या बारकाईंना समोर आणतील. त्यामुळे घटेनेचे बारकावे दर्शवण्यासाठी अभिषेक योग्य असल्याचा विश्वास मुकेश छाबडा यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी देशातील प्रशासकीय विभागांत प्रमुख पदांवर काम केले आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवेत त्यांनी केलेल्या कार्यांसाठी ते ओळखले जातात. दिल्लीतील अनेक अवैध्यरित्या चालणाऱ्या बांधकामांच्या विरोधात कारवाईचे नेतृत्व देखील त्यांनी केले आहे. तसेच दिल्लीत चालणारी ऑड-इवन ट्रॅफिक ही योजना देखील त्यांच्यात निदर्शना खाली चालवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -