त्या’ डिनर डेटनंतर तुटले Ibrahim Ali Khan आणि Palak Tiwariचे नाते? काय घडलं त्या रात्री?    

या प्रकाराच्या एक दिवस आधीच पलक तिवारीला तिच्या मित्रासोबत स्पॉट करण्यात आले होते. त्यावेळी  पलक फार कूल होती. तिने मास्क घालून पापाराझींना पोझेस दिल्या होत्या. मात्र इब्राहिम सोबत असताना पलकला काय झाले हे कोणालाही कळले नाही.

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari relationship broke up after that dinner date?
त्या' डिनर डेटनंतर तुटले Ibrahim Ali Khan आणि Palak Tiwariचे नाते? काय घडलं त्या रात्री?    

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan)  मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan ) आणि टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari )  मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari)  हे सध्या त्यांच्या रिलेशनमुळे लाइम लाइटमध्ये आहे. पलक आणि इब्राहिम खान यांच्यात फार चांगल्या मैत्रीपलिकडे नाते आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. पलक आणि इब्राहिम यांना काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. त्यावेळी मीडियासमोर पलकने फार विचित्र रिअँक्शन्स दिल्या होत्या. पलकने मीडियापासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे इब्राहिम फार कूल होता. त्यांची ही डिनर डेट शेवटची होती त्यानंतर त्यांच्या नात्याला पूर्ण विराम लागला असे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, पब्लिक प्लेसमधील पलक आणि इब्राहिमची ही पहिली डेट होती पण कारमध्ये मीडियासमोर पलकने दिलेल्या रिअँक्शन इब्राहिमला अजिबात आवडल्या नाहीत. या प्रकाराने त्याला फार लज्जास्पद वाटले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पलकला देखील अजिबात आवडले नाही आणि त्यानंतर पलक आणि इब्राहिम यांनी एकमेकांना कधीही फोन केला नाही. दोघांमध्ये फार चांगली मैत्री असली तरी ते एकमेकांसाठी बनलेले नाहीत अशा प्रतिक्रीया त्यांच्या व्हायरल व्हिडीओवर पाहायाला मिळत आहेत.

या प्रकाराच्या एक दिवस आधीच पलक तिवारीला तिच्या मित्रासोबत स्पॉट करण्यात आले होते. त्यावेळी  पलक फार कूल होती. तिने मास्क घालून पापाराझींना पोझेस दिल्या होत्या. मात्र इब्राहिम सोबत असताना पलकला काय झाले हे कोणालाही कळले नाही. पलक तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहेच मात्र येत्या काळात पलक सिनेमात देखील दिसणार आहे.


हेही वाचा – Dhanush Aishwaryaa च्या निर्णयाने रजनीकांत कोलमडले! घटस्फोट टाळण्यासाठी लेकीला केली विनवणी