Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 6 फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी होणार आहे कियारा-सिद्धार्थचं लग्न

6 फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी होणार आहे कियारा-सिद्धार्थचं लग्न

Subscribe

कियारा आणि सिद्धार्थ हळदी, मेहेंदी आणि संगीताच्या विधीनंतर 6 फेब्रुवारीला सात फेरे घेतील. असं म्हटलं जात होतं मात्र, आता त्यांच्या लग्नाची वेगळीच तारीख समोर येत आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. हे जोडपेही त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहेत. या शाही लग्नाला 100 ते 125 पाहुणे येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये बॉलीवूडच्या सुपरस्टार्सच्या नावाचाही समावेश आहे. आता दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ हळदी, मेहेंदी आणि संगीताच्या विधीनंतर 6 फेब्रुवारीला सात फेरे घेतील. असं म्हटलं जात होतं मात्र, आता त्यांच्या लग्नाची वेगळीच तारीख समोर येत आहे. खरंतर त्यांचे लग्न उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारीला पार पडणार असून कालपासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ काल संध्याकाळी पार पडला असून आज सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडणार आहे. तसेच आज संध्याकाळी त्यांचे संगीत होईल. 7 फेब्रुवारी रोजी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

शेरशाहच्या शूटिंगदरम्यान हे जोडपे प्रेमात पडले
सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी शेरशाह या ऑनस्क्रीन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला, पण पापाराझींच्या कॅमेऱ्यात दोघांचं नातं त्यांच्या चाहत्यांसमोर उघडपणे समोर आलं. सध्या या जोडप्याने त्यांचे नाते अधिकृत केले आहे. दोघांची जोडी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. अनेक पार्ट्यांमध्येही कपल एकत्र दिसत आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -