आम्ही जर आता एकत्र एका खोलीत राहिलो तर एकमेकांचा जीव घेऊ; घटस्फोटानंतर समंथाचा खुलासा

या एपिसोडमध्ये समंथाने करण आणि अक्षय सोबत दिल खुलास गप्पा देखील मारल्या. तसेच आपल्या पर्सनल आयुष्याबाबात काही खुलासे देखील केले.

टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभु वारंवार तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून समंथा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. नुकतीच ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत करण जौहरच्या कॉफी विद रपण ७ मध्ये आली होती. गुरूवारी हा एपिसोड प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये समंथाने करण आणि अक्षय सोबत दिल खुलास गप्पा देखील मारल्या. तसेच आपल्या पर्सनल आयुष्याबाबात काही खुलासे देखील केले. इतकंच नाही तर, करणने जेव्हा तिला तिच्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारला तेव्हा खूप विचार करू उत्तर देखील देलं.

घटस्फोटाबाबात समंथाचं उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Cinee Updates 🧿 (@cineeupdates)

या एपिसोडमध्ये करण जौहरने समंथाला विचारले की, तिला तिच्या चाहत्यांना घटस्फोटाबाबत सांगणं कसं होतं. त्यावेळी समंथा म्हणाली की, “चाहत्यांना आपल्या आयुष्याबाबत सांगण हा माझा निर्णय होता. जेव्हा आम्ही वेगळे झालो, तेव्हा यामुळे मी जास्त दुःखी होऊ शकत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि माझ्या चाहत्यांच माझ्या आयुष्यात खूप मोठ्ठ योगदान आहे.”

त्यानंतर करणने समंथाला घटस्फोट झाल्यानंतर आयुष्य कसं आहे हे विचारलं. तेव्हा समंथा म्हणाली, “खूप कठिण होत, पण आता सर्व ठिक आहे. मी आधीपेक्षा जास्त ताकतवर झाले आहे.” त्यानंतर करणने विचारलं तुझ्या आधीच्या नवऱ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अजूनही मतभेद आहेत का? यावेळी समंथाने गमतीशीर उत्तर दिलं त्यावेळी ती म्हणाली की, “जर आम्ही एका खोलीत एकत्र आहोत, तर तुम्हाला त्या खोलीतील धारदार गोष्टी लपवून ठेवाव्या लागतील.” समंथाच्या मते, घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्य एकमेकांना एकत्र एका खोलीत सुद्धा झेलू शकत नाहीत. जर असं काही झालं तर त्या दोघांमध्ये मारामारी होऊ शकते. त्यानंतर समंथा म्हणाली की, “अजूनही आमच्यात आपापसात सहमत होत नाही. मात्र भविष्यात गोष्टी सुरळीत होतील अशी आशा आहे.”

 


हेही वाचा :रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ