सावरकरांचा अपमान करणं थांबव नाहीतर…अभिनेत्री स्वरा भास्करला धमकीचं पत्र

स्वराला आलेलं हे पत्र दिल्ली येथून पाठवण्यात आले आहे. तसेच हे पत्र हिंदी भाषेत लिहिण्यात आले आहे. यामध्ये स्वराला धमकी देण्यात आली आहे

अभिनेता सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला देखील एक धमकीचे पत्र आले आहे. स्वरा भास्करला तिच्या मुंबईमधील वर्सोवा येथील राहत्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे. ज्यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बातमी पोलिसांनी मिळताच, त्यांनी तपास सुरू केलेला आहे. खरंतर हे पत्र मिळाल्यानंतर स्वरा भास्करने स्वताः पोलिस वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञात व्यक्तींची तक्रार दाखल केली आहे.

स्वरा भास्करला आलं धमकीचं पत्र


सूत्रांच्या मते, स्वराला आलेलं हे पत्र दिल्ली येथून पाठवण्यात आले आहे. तसेच हे पत्र हिंदी भाषेत लिहिण्यात आले आहे. यामध्ये स्वराला धमकी देण्यात आली आहे की, सावरकरांचा अपमान करणं थांबव आणि तुझ्या चित्रपटांकडे लक्ष दे, नाहीतर तुझा अंतिम संस्कार होईल असं लिहिलेलं आहे. तसेच या पत्राच्या शेवटी जय हिंद, या देशाचे नवजवान असं लिहिलेले आहे. दरम्यान या पत्राबाबत स्वराने वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खरंतर स्वरा भास्कर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. २०१७ मध्ये स्वरा भास्करने एक ट्वीट शेअर केलं होतं, ज्यामध्ये तिने लिहिलं होतं की, सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली. तुरूंगातून बाहेर निघण्याची घोषणा केली! हे खऱ्या अर्थाने वीर नाही. स्वराच्या या पोस्टमुळे स्वराला ट्वीटरवर खूप ट्रोल करण्यात आलं होत.


हेही वाचा :अरे बापरे ! ‘नागिन ६’चं प्रमोशन करण्यासाठी सेटवर आला खराखुरा नाग; व्हिडीओ व्हायरल