घरमनोरंजनतुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर... 'रक्षाबंधन'वरील बहिष्काराबाबत अक्षय कुमारची प्रतिक्रिया

तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर… ‘रक्षाबंधन’वरील बहिष्काराबाबत अक्षय कुमारची प्रतिक्रिया

Subscribe

८ ऑगस्ट रोजी अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकत्ता येथे गेला होता. त्यावेळी त्याने चित्रपटावर होत असलेल्या बहिष्काराच्या मागणीबाबत आपलं मत मांडलं.

अलीकडे सोशल मीडियावर कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित होणार असेल त्याच्या आधी त्यावर काहीजण बहिष्कार टाकण्याची मागणी करतात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधन याचित्रपटांवर देखील सध्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ११ ऑगस्ट रोजी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान, आता चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षय कुमारने चित्रपटावर होत असलेल्या बहिष्काराच्या मागणीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

८ ऑगस्ट रोजी अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकत्ता येथे गेला होता. त्यावेळी त्याने चित्रपटावर होत असलेल्या बहिष्काराच्या मागणीबाबत आपलं मत मांडलं. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, त्यावेळी अक्षय म्हणाला की, “हा एक आझाद देश आहे. जर तुम्हाला कोणता चित्रपट पाहायचा नसेल, तो तुमचा निर्णय आहे. मी तुमच्याशी एक बोलू इच्छितो, कोणतीही इंडस्ट्री असो, कपड्याची इंडस्ट्री किंवा फिल्म इंडस्ट्री, सगळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करतात. त्यामुळे अशाप्रकारे चित्रपटांवर बहिष्कार टाकून काही उपयोग नाही.”

- Advertisement -

बहिष्काराच्या मागणीवर आमिर खानने सुद्धा दिली होती प्रतिक्रिया
दरम्यान, याआधी आमिर खानने देखील एका मुलाखतीत चित्रपटांवर टाकल्या जाणाऱ्या बहिष्कारावर आपलं मत मांडलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होती की, “काही लोकांना वाटतं मला भारत आवडत नाही. मला खूप दुःख होतं, जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर अशाप्रकारे बहिष्कार टाकतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, ते जो विचार करत आहेत, तो पूर्ण चुकिचा आहे. माझी त्यांना विनंती आहे की, माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये आणि त्याला नक्की पाहा.”

‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये होणार चढाओढ
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये हे दोन्ही चित्रपट चर्चेत आहेत. २०२२ मध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारशी गर्दी करत नाहीत. अशातच आता दोन्ही चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल हे पाहण्यासारखे आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -