घरमनोरंजन'IFFI' फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार २००पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण

‘IFFI’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार २००पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण

Subscribe

गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये ५० व्या इफ्फीचा शुभारंभ होणार

भारतात होणारा चित्रपटांचा मोठा इव्हेंट अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (IFFI) चा गोव्यात आजपासून शुभारंभ होणार आहे. गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये ५० व्या इफ्फीचा शुभारंभ होणार आहे. ९ दिवस असणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारत आणि परदेशातील अनेक चित्रपट दाखवण्यात येणार आहे. जगातील हाजारो प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील सहभाग घेणार आहे.

आशिया खंडातील सगळ्यात मोठा असणारा इफ्फी यंदा गोल्डन जुबली सादरा करत आहे. यावेळी भारताकडून अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे प्रमुख असणार आहे. यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडले गेलेले अमिताभ बच्चन आणि यावर्षी ५० वर्षे पूर्ण केलेल्या चित्रपटांसाठी विशेष स्क्रिनिंग केले जाणार आहे, ज्यात बर्‍याच चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. हे ५० वर्ष पुर्ण केलेल्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यासारख्या सुपरस्टारचे चित्रपट समाविष्ट असतील.

- Advertisement -

२०० पेक्षा जास्त चित्रपटाचे होणार स्क्रिनिंग

५० व्या इफ्फीमध्ये ७६ देशांचे २०० हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहे. यापैकी भारतीय विभागात २६ फिचर फिल्म आणि १५ इतर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. हा सोहळा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान असणार आहे. गिरीश कर्नाड, कादर खान, खय्याम यांचे देखील चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

अशी सुरू आहे तयारी

- Advertisement -

रजनीकांत होणार गोल्डन जुबली अवॉर्डने सन्मानित

यावेळी रजनीकांत यांना गोल्डन जुबली अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल. तसेच फ्रेंच अभिनेत्री इसाबेल हुपर्टला लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल. सुवर्णमहोत्सवानिमित्त ५० महिला चित्रपट निर्मात्यांचे ५० चित्रपट प्रदर्शित केले जातील. यावर्षी रशिया हा या सोहळ्याचा सहयोगी देश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -